Video: चहलच्या बायकोचा 'भांगडा' होतोय व्हायरल

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 31 मार्च 2021

नव्या व्हिडिओमध्ये शिखर धवनसोबत धनश्री ‘भांगडा’ डान्स करताना दिसत आहे.

भारतीय संघातील फिरकीपटू यजुवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा तिच्या डान्स स्टाईलसाठी सतत चर्चेत असते. तिच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मिडियावर खूपदा व्हायरल होतात. काही दिवसांपूर्वी धनश्रीने टीम इंडियाचा फलंदाज श्रेयस अय्यरसोबत डान्स करत सोशल मिडियावर एकच खळबळ उडवून दिली होती. आता ती टीम इंडियाचा सलामीवीर आणि विस्फोटक फलंजदाज शिखर धवनसोबत पुन्हा एकदा डान्स करताना दिसत आहे.

नव्या व्हिडिओमध्ये शिखर धवनसोबत धनश्री ‘भांगडा’ डान्स करताना दिसत आहे. तसेच हे दोघेही पंजाबी गाण्यावर अफलातून डान्स करत आहेत. नवा व्हिडिओ धनश्रीने तिच्या इन्स्टाग्राम आकांउटवरुन शेअर केला असून आत्तापर्यंत 40 हाजाराहून अधिक लाइक्स भेटल्या आहेत. चाहत्यांनी शिखर आणि धनश्रीच्या व्हिडिओला चांगलीच पसंती दिली आहे. धनश्रीने या व्हिडिओला ‘गब्बरच्या स्टाइलमध्ये भांगडा’ असे कॅप्शन दिले आहे. (Video Chahals wifes bhangra goes viral)

ICC T-20 Ranking : शफाली वर्मा अग्रस्थानी कायम

यजुवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा व्यवसायाने डॉक्टर असून तीने डान्सच्या माध्यमातून चांगलीच प्रसिध्दी मिळवली आहे. ती स्वत:हा एक कोरोओग्राफरही आहे. काही दिवसांपूर्वी धनश्रीने जस्सी गिलसह ‘ओये होये होये’ हे गाणे रिलीज केले होते. या गाण्याला यूट्यूबवर 21 लाखांहून अधिक वेळा पाहिले गेले. तर धनश्रीचे इन्स्टाग्रामवर 33 लाखाहूंन अधिक फॉलोअर्स आहेत. तर दुसरीकडे यूट्यूबर तिच्या चाहत्यांची संख्या 20 लाखाच्या आसपास आहे. धनश्री अनेकदा तिचे डान्सचे व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते.

 
 

संबंधित बातम्या