WIvsSL: किरॉन पोलार्डने 6 चेंडूत ठोकले 6 षटकार; व्हिडीओ तुफान व्हायरल

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 4 मार्च 2021

वेस्ट इंडीज आणि श्रीलंका यांच्यादरम्यान खेळवल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेच्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने 41 चेंडू  व 4 बळी राखत विजय मिळविला. या सामन्यात विंडीजचा कर्णधार किरॉन पोलार्डने अकिला धनंजयच्या एका षटकात सहा षटकार ठोकत युवराज सिंग आणि हर्षेल गिब्सच्या विक्रमाशी बरोबरी केली.

अँटिगा : वेस्ट इंडीज आणि श्रीलंका यांच्यादरम्यान खेळवल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेच्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने 41 चेंडू  व 4 बळी राखत विजय मिळविला. या सामन्यात विंडीजचा कर्णधार किरॉन पोलार्डने अकिला धनंजयच्या एका षटकात सहा षटकार ठोकत युवराज सिंग आणि हर्षेल गिब्सच्या विक्रमाशी बरोबरी केली. युवराज आणि गिब्स या दोघांनीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात सहा षटकार लगावले आहेत. मात्र, युवराजने T20 आणि गिब्सने वन डेमध्ये हा विक्रम केला आहे. किरॉन पोलार्डने सामन्याच्या पाचव्या षटकात हा पराक्रम केला. पोलार्डने 11 चेंडूत शानदार 38 धावा फटकावल्या, ज्यात 6 चेंडूत 6 षटकारांचा समावेश होता. युवराज सिंगच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एकाच ओव्हरमध्ये 6 षटकार ठोकण्याच्या विक्रमाशी पोलार्डने 14 वर्षांनंतर बरोबरी केली आहे.

World Test Championship: ICCचं ट्विट होतंय जबरदस्त व्हायरल

या धमाकेदार खेळीमुळे पोलार्ड सामनावीर ठरला. जेव्हा पोलार्ड क्रीजवर आला तेव्हा वेस्ट इंडिज संघाने चार विकेटस् गमावल्या होत्या. लेंडल सिमन्स (2), एव्हिन लुईस (2), ख्रिस गेल (0) आणि निकोलस पूरन (0) धावा करून बाद झाले होते. यानंतर, पोलार्ड आणि होल्डरने वेस्ट इंडिजचा डाव सावरला आणि मालिकेतला पहिला विजय वेस्ट इंडिजला मिळवून दिला. यासह, पोलार्ड एका षटकात 6 षटकार ठोकणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिसरा खेळाडू ठरला. माजी भारतीय अष्टपैलू युवराज सिंग T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात सहा षटकार ठोकणारा एकमेव खेळाडू ठरला होता. 2007 मध्ये युवराज सिंगने आयसीसी वर्ल्ड T20 मध्ये इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात सलग सहा षटकार लगावले होते.

युवराजच्या आधी दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज हर्षल गिब्सने 2007 मध्ये एकदिवसीय विश्वचषकात हा पराक्रम केला होता. गिब्सने नेदरलँड्सचा गोलंदाज डॅन व्हॅन बंगेच्या एका षटकात सहा षटकार लगावले. वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेचा पहिला T20 सामना अँटिगामध्ये खेळवला गेला. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 9 गडी गमावून 131 धावा केल्या आणि वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 132 धावांचे लक्ष्य ठेवले. यानंतर वेस्ट इंडीजने 13.1 षटकांत 6 गडी गमावून 134 धावा केल्या आणि सामना चार विकेटने जिंकला. या मालिकेचा दुसरा सामना याच मैदानावर 6 मार्च रोजी खेळवला जाईल.

संबंधित बातम्या