Video कोरोना चाचणीदरम्यान सचिन तेंडुलकरने मेडीकल स्टाफची केली अशी गंमत

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 10 मार्च 2021

रायपूरमध्ये खेळवण्यात येणाऱ्या सामन्याआधी कोरोना चाचणीस सामोरं जाताना माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने वैद्यकीय कर्मचार्‍यांची मजा केली. याचा व्हिडीओ त्याने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे.

नवी दिल्ली : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सचिन रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज मध्ये इंडिया लेजेंड्सचं नेतृत्व करत आहे. सचिनच्या नेतृत्वाखालील संघाने पहिल्या सामन्यात बांगलादेश लेजेंड्सचं 10 गडी राखून नमवत लीगमध्ये मोठी सुरुवात केली.  सध्या भारतात कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याने, या स्पर्धेदरम्यान वारंवार खेळाडूंची चाचणी कऱण्यात येत आहे.

Road Safety World Series T20: इरफान पठाणच्या तुफानी खेळीनंतरही इंडिया लीजेंड्स पराभूत

रायपूरमध्ये खेळवण्यात येणाऱ्या सामन्याआधी कोरोना चाचणीस सामोरं जाताना माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने वैद्यकीय कर्मचार्‍यांची मजा केली. याचा व्हिडीओ त्याने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. व्हिडिओत कोरोना चाचणीसाठी सचिनचा स्वॅब नमुना घेतला जात आहे. नाकाचा स्वॅब घेतल्यावर सचिन किंचाळला. परंतु, थोड्याच वेळात हसत तो मजा करत असल्याचे त्याने सांगितले. "टेन्शन आपको है या मुझे है? असे सचिनने विचारताच वैद्यकिय कर्मचाऱ्यांमध्ये एकच हशा पिकला. 

ISL 2020-21: एटीके मोहन बागान अंतिम फेरीत दाखल

सचिनने मंगळवारी व्हिडिओ पोस्ट करताना लिहिले की, “मी 200 टेस्ट आणि 277 कोरोना टेस्ट खेळलो आहे! मूड हलका करण्यासाठी थोडीशी मजा. आम्हाला खेळायला मदत केल्याबद्दल आमच्या वैद्यकीय कर्मचार्‍यांचे आभार! ”
 

संबंधित बातम्या