सुरेश रैनाचा सराव करतानाचा व्हिडिओ व्हायरल

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 18 मार्च 2021

रैनाचा सरावा दरम्यानचा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्जने आपल्या ऑफिशियल ट्विटर हॅंडलवरुन शेअर केला आहे.

गाझियाबाद: (Video of Suresh Raina practicing goes viral) इंडियन प्रिमिअर लिगच्या हंगामाची सुरुवात (आयपीएल) 9 एप्रिलपासून होणार आहे. याच पार्श्वभूमीवर चेन्नई सुपर किंग्जचा अनुभवी खेळाडू सुरेश रैनाने आयपीएल 2021 साठीची तयारी सुरु केली आहे. रैनाने गाझियाबादमध्ये सरावाला सुरुवात केली. चेन्नई सुपर किंग्जची जर्सी घालून तो बुधवारी सरावासाठी मैदानात उतरला. रैनाचा सरावा दरम्यानचा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्जने आपल्या ऑफिशियल ट्विटर हॅंडलवरुन शेअर केला आहे.

या सराव सत्रादरम्यान (Suresh Raina) रैनाने जोरदार फटकेबाजी केली. 30 सेंकदाच्या व्हिडिओमध्ये रैना आपले ट्रेडमार्क फटकेबाजी करताना दिसत आहे. या व्हिडिओमधून रैना चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचेही दिसत आहे. त्याने स्वत:हा व्हिडिओ सोशल मिडियावर अपलोड केला आहे. यंदाच्या आयपीएल हंगामासाठी आपण पूर्णपणे तयार आहे, असं रैनाने पोस्ट केलेल्या व्हिडिओच्य़ा माध्यमातून सांगितले.

INDvsENG : जोस बटलरच्या अर्धशतकीय खेळीमुळे पाहुण्या इंग्लंडचा टीम इंडियावर विजय 

सुरेश रैना 21 मार्चपासून चेन्नई सुपर किंग्जच्या शिबीरामध्ये सामील होणार होता मात्र तो 24 मार्चनंतर सीएसकेच्या शिबीरामध्ये सामील होणार आहे. सीएसकेचे मुख्य कार्यकारी प्रमुख काशी विश्वनाथ यांनी एका क्रिडासंस्थेशी संवाद साधताना म्हटले की, ‘’सुरेश रैनाला काही वैयक्तिक काम आहे. काम संपल्यानंतर तो संघात सामील होणार आहे. 24 मार्चनंतर तो संघात सामील होणार असल्याचे त्याने आम्हाला सांगितले होते. (Video of Suresh Raina practicing goes viral)

वैयक्तिक कारणांसाठी 2020 मध्ये पार पडलेल्या आयपीएलच्या हंगामात रैना सामील झाला नव्हता. याचा परिणाम सीएसकेच्या कामगिरीवर दिसून आला होता. मागील हंगामात सीएसकेला उत्तम कामगिरी करता आली नाही. त्यामुळे या हंगामात रैनाच्या आगमानामुळे संघाची फलंदाजी अधिक सक्षम आणि बळकट होईल. (Video of Suresh Raina practicing goes viral)

 

संबंधित बातम्या