ट्रेंट बोल्टने घेतलेल्या अफलातून झेलचा व्हिडिओ होतोयं चांगलाचं व्हायरल

ट्रेंट बोल्टने घेतलेल्या अफलातून झेलचा व्हिडिओ होतोयं चांगलाचं व्हायरल
The video of Trent Bolts catch is going viral

नुकत्याच संपलेल्या बांग्लादेशविरुध्दच्या एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने घेतलेल्या झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. हा झेल इतका जबरदस्त होता की, आयसीसीनेही बोल्टचा व्हिडिओ शेअर करत अभिनंदन केले.

बांग्लादेशविरुध्दच्या तीन एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यामध्ये बोल्टने लिटन दासचा झेल टिपला. बांग्लादेश करत असलेल्या फलंदाजीच्या 7 व्या षटकामध्ये मॅट हेन्री गोलंदाजी करत होता. हेन्रीने टाकलेल्या चेंडूवर दासने मारलेला फटका थर्ड मॅनच्या दिशेने गेला. त्याच ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असलेल्या बोल्टने हवेत सूर मारत तो झेल अलगद टिपला. लिटलला 21 धावावर समाधान मानत परत जावे लागले. ट्रेंट बोल्ट गोलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणातही माहिर आहे. (The video of Trent Bolts catch is going viral)

आयपीएलमध्येही त्याने क्षेत्ररक्षणात उत्तम कामगिरी केली आहे ते आपण सर्वांनी पाहिलं आहेच. न्यूझीलंडने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांग्लादेशला 164 धावांनी पराभूत केले. या विजयासह न्यूझीलंडने 3-0 विजय संपादन केला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत बांग्लादेशसमोर 50 षटकामध्ये 6 बाद 318 धावांचे लक्ष ठेवले होते.

न्यूझीलंडच्या लक्षाचा पाठलाग बांग्लादेशचा डाव 42.2 षटकात 154 आटोपला. बांग्लादेशच्या महमुदुल्लाने 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 76 धावा पटकावल्या. डेव्होन कॉनवेला सामनावीर आणि मालिकावीर अशा दोन्ही पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com