INDvsENG: हार्दिक पांड्याने हात जोडून मागितली टिम इंडियाची माफी; व्हिडिओ व्हायरल

INDvsENG: हार्दिक पांड्याने हात जोडून मागितली टिम इंडियाची माफी; व्हिडिओ व्हायरल
Video Viral INDvsENG Hardik Pandya joins hands in front of Shikhar Dhawan when catches ben Stokes

पुणे: भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा एकदिवसीय सामना: भारताविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात बेन स्टोक्सने 39 बॉसमध्ये 35 धावा केल्या. आणि  टी. नटराजनच्या चेंडूवर बेन स्टोक्सला झेलबाद केले. जेव्हा स्टोक्स आऊट झाला तेव्हा हार्दिक पांड्याने हात जोडून मैदानावर लोटांगण घातले आणि सर्व सहकारी खेळाडूंकडून माफी मागितली.

हार्दिकने केलेली ही कृती खूप व्हायरल होत असून चाहतेही यावर जोरदार भाष्य करीत आहेत. हार्दिकने स्टोक्सचा झेल सोडला होता, त्यानंतर भारतीय खेळाडू खूपच संतप्त आणि निराश दिसत होते. हार्दिकने जेव्हा स्टोक्सचा झेल सोडला तेव्हा त्याने फलंदाजी करीत 15 धावा फटकावल्या होत्या. हार्दिकने स्टोक्सची कॅच सोडल्यानंतर रोहित शर्मापासून ते विराट कोहलीपर्यंत सगळेच निराश झाले. हार्दिकला ही कॅच चुकवेल असा कोणालाही विश्वास नव्हता. 

अशा परिस्थितीत स्टोक्स टी. नटराजनच्या चेंडूवर अकराव्या षटकात बाद झाला तेव्हा हार्दिकन मैदानावर लोटांगणच घातले आणि त्याने सर्व साथीदारांकडे हात जोडून माफी मागितली. हार्दिकने असे करताच कोहली आणि रोहितदेखील गंमतीने पांड्याच्या पाठीवर थाप मारताना दिसले. नटराजनच्या चेंडूवर स्टोक्सला गोलंदाज शिखर धवनने झेलबाद केले. 

इंग्लंडविरुद्धच्या निर्णायक सामन्यात भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली आणि भारताकडून 329 धावा केल्या, पंतने 78 धावा केल्या, शिखर धवन 67 आणि हार्दिकने 64 धावा केल्या त्या व्यतिरिक्त, शार्दिलने शेवटच्या क्षणी 30 धावा केल्या. आणि स्कोअर 329 धावांवर नेण्यात महत्वाची भूमिका बजावली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com