VIDEO: अश्विनची प्रीती जिंकली, रडणाऱ्या रितिकाला दिली जादूची झप्पी

प्रीतीच्या या हृदयस्पर्शी कृत्यामुळे चाहते तिची खूप प्रशंसा करत आहेत
R Ashwin wife prithi narayanan hug ritika sajdeh
R Ashwin wife prithi narayanan hug ritika sajdeh Twitter

IPL 2022 च्या 44 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) राजस्थान रॉयल्सचा (RR) 5 विकेट्सने पराभव करत पहिला विजय मिळवला. मात्र, हा विजय मिळवण्यासाठीही रोहित शर्माच्या (Rohit Sharma) संघाला शेवटच्या षटकापर्यंत वाट पाहावी लागली. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 158 धावा केल्या होत्या आणि मुंबईला सामना जिंकण्यासाठी 159 धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी 20 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पूर्ण केले. (IPL Updates)

R Ashwin wife prithi narayanan hug ritika sajdeh
CSK ची मोठी घोषणा, रवींद्र जडेजाने सोडले कर्णधारपद

या सामन्यात अनेक रोमांचक क्षण आले असले तरी रोहित शर्मा आऊट झाल्यावर चाहत्यांना एक मजेशीर क्षण पाहायला मिळाला ज्यामुळे बरीच चर्चा झाली. तर घडले असे की संजू सॅमसनने मुंबईच्या डावातील तिसऱ्या षटकाची जबाबदारी रविचंद्रन अश्विनकडे (R Ashwin) दिली आणि या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अश्विनने रोहितला बाद केले.

रोहित शर्माची विकेट पडल्यानंतर स्टेडियममध्ये बसलेली रोहितची पत्नी रितिका सजदेह (ritika sajdeh) खूपच निराश झाली आणि तिच्या डोळ्यात अश्रूही दिसत होते. रितिकासोबत अश्विनची पत्नी प्रीती नारायण (prithi narayanan) देखील स्टेडियममध्ये उपस्थित होती आणि रितिकाला निराश होताना पाहून तिने रितिकाकडे जाऊन मिठी मारली आणि तिला आधार दिला. ही घटना कॅमेरामनने आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आणि पाहताच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

R Ashwin wife prithi narayanan hug ritika sajdeh
गोकुळम केरळास संघाने चर्चिल ब्रदर्सला दिली कडवी झुंज

प्रीतीच्या या हृदयस्पर्शी कृत्यामुळे चाहते तिची खूप प्रशंसा करत आहेत आणि या सामन्यापेक्षा ती अधिक चर्चेचा विषय बनली. त्याचवेळी या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर अश्विनने चेंडूवर चांगलाच खेळ रंगवला होता. सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना अश्विनने केवळ 9 चेंडूत 21 धावा केल्या आणि संघाला 150 च्या पुढे नेण्यात मोलाची भूमिका बजावली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com