विजय हजारे करंडक : छत्तीसगडचा आठ विकेट राखून गोवा संघावर दणदणीत विजय

दैनिक गोमन्तक
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

फलंदाजी आणि गोलंदाजीत निष्प्रभ ठरलेल्या गोव्याची पाठ सोडण्यास पराभव तयार नाही. विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या एलिट अ गट त्यांच्यावर छत्तीसगडने बुधवारी आठ विकेट राखून दणदणीत विजय नोंदविला. सामना गुजरातमधील सूरत येथील खोलवाड जिमखाना मैदानावर झाला.

पणजी : फलंदाजी आणि गोलंदाजीत निष्प्रभ ठरलेल्या गोव्याची पाठ सोडण्यास पराभव तयार नाही. विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या एलिट अ गट त्यांच्यावर छत्तीसगडने बुधवारी आठ विकेट राखून दणदणीत विजय नोंदविला. सामना गुजरातमधील सूरत येथील खोलवाड जिमखाना मैदानावर झाला.

गोव्याचा हा स्पर्धेतील सलग तिसरा पराभव ठरला. अगोदरच्या लढतीत बडोदा आणि गुजरातकडून हार पत्करलेल्या गोव्यास छत्तीसगडने लीलया नमविले. प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर दर्शन मिसाळच्या (56- 54 चेंडू, 5 चौकार, 1 षटकार) अर्धशतकामुळे गोव्याने प्रारंभीच्या पडझडीनंतर 49.2 षटकांत सर्व बाद 210 धावांची मजल गाठली. दर्शनचे हे लिस्ट ए क्रिकेटमधील चौथे अर्धशतक ठरले. वीरप्रताप सिंगच्या (4-29) भेदक गोलंदाजीचा सामना करणे गोव्याचे अवघड ठरले. छत्तीसगडने 36.5 षटकांत 2 बाद 213 धावा करून एकतर्फी विजयाची नोंद केली.

INDvsENG 3rd Day1 : अक्षर पटेलच्या दमदार कामगिरीमुळे इंग्लंडचा संघ अडचणीत 

छत्तीसगडने सुरवातीपासून गोव्याच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखले. त्यांच्या पहिल्या तिन्ही फलंदाजांनी दणकेबाज अर्धशतके ठोकली. 91 धावांवर (106 चेंडू, 9 चौकार, 2 षटकार) नाबाद राहिलेल्या ऋषभ तिवारीने दोन महत्त्वपूर्ण भागीदारी रचून छत्तीसगडला स्पर्धेतील पहिला विजय मिळवून दिला. ऋषभ व शशांत चंद्रकार (55- 58 चेंडू, 9 चौकार) यांनी छत्तीसगडला 93 धावांची दणदणीत सलामी दिली. नंतर ऋषभने कर्णधार हरप्रीतसिंग भाटिया (55 चेंडू, 5 चौकार, 2 षटकार) याच्या साथीत दुसऱ्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी करून गोव्याच्या गोलंदाजांना निस्तेज ठरविले. विजयासाठी तीन धावा हव्या हरप्रीत गोव्याचा कर्णधार अमित वर्माच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत बाद झाला. अमित (2-34) वगळता गोव्याचे इतर गोलंदाज छाप पाडू शकले नाहीत.

 

संक्षिप्त धावफलक

गोवा : 49.2 षटकांत सर्व बाद 210 (एकनाथ केरकर 0, आदित्य कौशिक 1, स्नेहल कवठणकर 14, अमित वर्मा 46, कीनन वाझ 19, सुयश प्रभुदेसाई 44, दर्शन मिसाळ 56, दीपराज गावकर 2, लक्षय गर्ग 9, अमूल्य पांड्रेकर 0, विजेश प्रभुदेसाई नाबाद 0, वीरप्रताप सिंग 10-2-29-4, सौरभ मजुमदार 2-55, शशांक सिंग 2-32, सुमीत रुईकर 2-24) पराभूत वि. छत्तीसगड : 36.5 षटकांत 2 बाद 213 (ऋषभ तिवारी नाबाद 91, शशांक चंद्रकार 55, हरप्रीतसिंग भाटिया 56, विजेश प्रभुदेसाई 6-0-42-0, लक्षय गर्ग 6-0-29-0, दर्शन मिसाळ 7-0-47-0, दीपराज गावकर 3-0-20-0, अमित वर्मा 7.5-0-34-2, अमूल्य पांड्रेकर 7-0-40-0).
 

संबंधित बातम्या