पाकिस्तानच्या संपूर्ण संघावर एकटा विराटच पडतोय भारी
virat kohli

पाकिस्तानच्या संपूर्ण संघावर एकटा विराटच पडतोय भारी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऑक्टोबर 2020 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत खेळाडूंचे वार्षिक करार जारी केले आहेत. यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसह रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना ए प्लस यादीमध्ये स्थान दिले आहे. बीसीसीआय करारानुसार श्रेणी ए + खेळाडूंना वर्षाकाठी 7 कोटी रुपये मिळतात. तसेच ए श्रेणीतील खेळाडूंना करारानुसार पाच कोटी रुपये मिळतील. ग्रेड-बी आणि सी खेळाडूंना अनुक्रमे 3 कोटी आणि 1 कोटी रुपये मिळतात. ग्रेड ए मध्ये रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजार, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, केएल राहुल, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, रिषभ पंत, हार्दिक पंड्या यांना स्थान देण्यात आले आहे. (Virat alone is falling heavily on the entire Pakistan team)

म्हणजेच या कराराखाली भारतीय कर्णधार विराट कोहलीला बीसीसीआयकडून वर्षाकाठी 7 कोटी रूपये वेतन म्हणून देण्यात येते. दुसरीकडे, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या करारानुसार ग्रेड ए च्या खेळाडूंना 11 लाख पाकिस्तानी रुपये (म्हणजे 5.20 लाख भारतीय रुपये) पगाराच्या रूपात देते. या व्यतिरिक्त पाकिस्तान बोर्ड ग्रेड बी च्या खेळाडूंना 7.50 लाख पाकिस्तानी रुपये (म्हणजे 3.54 लाख भारतीय रुपये) देते. याशिवाय सी श्रेणीतील खेळाडूंना पगाराच्या रुपात बोर्ड 5.50 लाख पाकिस्तानी रुपये (म्हणजेच 2.60 लाख भारतीय रुपये) देते. पाकिस्तान बोर्डाने श्रेणी ए प्रकारात 3 खेळाडू, श्रेणी ब प्रकारात 9 खेळाडू आणि सी श्रेणीत 6 खेळाडूंचा समावेश केला आहे. जर या सर्व खेळाडूंचे एकूण पैसे मिसळले गेले तर ते 7.4 कोटी रुपये होते.

विराट कोहली इंडियन प्रीमियर लीगच्या सुरुवातीपासून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा खेळाडू आहे. आरसीबीने 2021 च्या आयपीएलसाठी विराटला 17 कोटी रुपये दिले आहेत. तसेच पाकिस्तानची सुपर लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तान सुपर लीगमधील सर्वात महागडा खेळाडू २ कोटी रुपयाचा आहे. किएरॉन पोलार्डला पीएसएलमध्ये पेशावर झालमी 2 कोटी रुपये देते.     

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com