विराटने केला ट्विटर बायोमध्ये बदल ; 'भारतीय क्रिकेटर' हा शब्द काढला

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 18 जानेवारी 2021

विराटने आपल्या ट्विटर बायोमधून ‘इंडियन क्रिकेटर’ हा शब्द काढून टाकल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलंय.

मंबई :  सध्या टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरूद्ध दौऱ्यातील शेवटता कसोटी सामना खेळत आहे. भारतीय संघ सध्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळतो आहे. कारण, कॅप्टन कोहली सध्या पॅटर्निटी लिववर मायदेशात असून, आपल्या मुलीची व पत्नीची काळजी घेत आहे. पण अस असले तरी, तरी मायदेशातून आपल्या टीम इंडियाला कायमच प्रेरणा देत, त्यांना चिअर करतोय.

INDvsAUS : चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाची भक्कम आघाडीकडे वाटचाल, पावसाचा व्यत्यय

विराटची ही पॅटर्निटी लिव्ह पहिल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. बऱ्याच लोकंकाडून त्याचा असं दौरा सोडून जाण्यावर टीका करण्यात आली होती. त्यातच, विराटच्या अनुपस्थितीत टीम इंडियाने चांगली कामगिरी करत दुसरी कसोटी जिंकली होती.

यातच, आता विराटने आपल्या ट्विटर बायोमधून ‘इंडियन क्रिकेटर’ हा शब्द काढून टाकल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलंय. त्याच्या आधीच्या बायोमध्ये ‘इंडियन क्रिकेटर, खेळाडू, गाड्यांचा चाहता’ हे शब्द लिहिले होतो. पण आता त्याऐवजी ‘अ प्राऊड हजबंड एन्ड फादर’ म्हणजेच ‘एक अभिमान वाटणारा पती व बाप’ अशा आशयाचा बायो लिहिला आहे.

संबंधित बातम्या