तिसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यातील प्लेइंग इलेव्हनच्या निवडीवरुन विराटसमोर धर्मसंकंट

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 15 मार्च 2021

शिखर धवनबरोबर पहिल्या टी-20 सामन्यामध्ये प्रथम ओपनिंग करण्यासाठी के. एल. राहुलला संधी देण्यात आली होती.

अहमदाबाद: भारत-इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेची सुरुवात झाली. पहिल्या टी-20 सामन्यात पाहुण्या संघाने जोरदार प्रदर्शन केले, पहिल्या सामन्यामध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये टीम इंडियाने जोरदार कमबॅक करत इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला. याच पार्श्वभूमीवर आता तिसरा टी-20 सामना सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसमोर प्लेइंग इलेव्हनच्या निवडीवरुन धर्मसंकट निर्माण झाले आहे. 

टीम इंडिया पहिल्या टी-20 सामन्यात रोहीत शर्मा विना खेळण्यासाठी उतरली होती. मात्र आता रोहीतच्या पुनरागमनावरुन आता कर्णधार विराट कोहली समोर धर्मसंकंट ऊभे राहिले आहे. पहिला टी- 20 सामना सुरु होण्यापूर्वी विराटने स्पष्ट केलं होतं की, दोन टी- 20 सामन्यासाठी रोहीत शर्माला आराम देण्यात आला आहे. तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये रोहीतचे पुनरागमन होणार आहे. शिखर धवनबरोबर पहिल्या टी-20 सामन्यामध्ये प्रथम ओपनिंग करण्यासाठी के. एल. राहुलला संधी देण्यात आली होती. तर दुसऱ्य़ा टी-20 सामन्यामध्ये शिखरबरोबर ओपनिंग करण्यासाठी युवा खेळाडू इशान किशनला संधी देण्यात आली होती.

...म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान 'पृथ्वी शॉ'ला झाले अश्रू अनावर

भारतीय संघातून इशान किशानचा पहिलाच अंतरराष्ट्रीय टी-20 सामना आहे. याच सामन्य़ामध्ये इशानने धमाकेदार अर्धशतक ठोकले. त्यामुळे इशानने कर्णधार विराट कोहलीला आनंदसह चिंतेत टाकले. के.एल राहुलला टी-20 विश्वकपसाठी ओपनिंग करण्यासाठी तयार करण्यात येत आहे. अशातच राहुलला बाहेर बसवणे टीम इंडियासाठी परवडणारे नाही. तसेच इशानचे धमाकेदार प्रदर्शन लक्षात घेता त्याला बाहेर बसवणे ते ही योग्य असणार नाही. रोहीत शर्मा टीम इंडियाचा उपकर्णधार असून त्याला संघात घ्यावे लागणार आहे.

दुखापतीमुळे आगोदरच रोहीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान एकदिवसीय आणि टी-20 सामने खेळू शकला नव्हता. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु झालेल्या टी-20 सामन्यातील दोन सामने रोहीत खेळू शकला नव्हता. त्यामुळे तिसऱ्या टी-20 सामन्यात संधी द्यावी लागणार आहे.    
 

संबंधित बातम्या