विराटने दिली आनंदाची बातमी, विराट आणि अनुष्काला 'कन्यारत्न'

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 11 जानेवारी 2021

टीम इंडियाचा धडाकेबाज कर्णधार विराट कोहलीच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे.

 मुंबई: टीम इंडियाचा धडाकेबाज कर्णधार विराट कोहलीच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे.विराटची पत्नी अनुष्का शर्माने सोमवारी दुपारी मुलीला जन्म दिला असून विराटने लगेच ट्वीट करत आपल्या चाहत्यांना गोड बातमी दिली.आम्हांला दोघांना सांगताना खूप आनंद होतो आहे की, आज दुपारी आमच्या मुलीचा जन्म झाला.तुमचं प्रेम आणि आशिर्वाद आमच्या पाठिशी आहेत.

यासाठी आम्ही तुमचे ऋणी आहोत.अनुष्का आणि आमची मुलगी दोघीही ठीक आहेत.आणि खरोखरच आमचं सौभाग्य आहे की,आम्हांला ही आयुष्यातील सुंदर गोष्ट अनुभवता आली.यावेळी आम्हाला आता प्रायव्हसी पाहिजे आहे,हे तुम्ही नक्कीच समजून घेवू शकता असं आम्ही समजतो शकतो' धाटनीची पोस्ट शेअर केली.विराटने ही आनंदाची बातमी सोशल मिडीयावर शेअर करताचं नेटकऱ्यांनी, चाहत्यांनी,सेलिब्रेटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे.सायना नेहवाल,इरफान पठाण यांनी लगेच ट्वीट करत विराट आणि अनुष्काला शुभेच्छा दिल्या.

संबंधित बातम्या