विराट स्वतः रोहितकडे भारतीय संघाची धूरा देऊ शकतो

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 28 मे 2021

आगामी इंग्लंड दौऱ्यानंतर म्हणजेच टी-20 विश्वचषकापूर्वी भारताचा पुढील कर्णधार कोण असेल ते स्पष्ट होईल. याशिवाय असेही होऊ शकते विराट स्वतःच कोणत्यातरी एका क्रिकेटच्या प्रकारातील जबाबदारी रोहीतला सोपवू शकतो.

भारतीय संघाचा (India) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) फलंदाज म्हणून श्रेष्ठ आहेच, परंतु यशस्वी कर्णधार म्हणून देखील आपली ओळख निर्माण केली आहे. विराटनंतर भारतीय संघाची धुरा कोणाच्या खांद्यावर असेल असा प्रश्न नेहमी उपस्थित केला जातो. यावर अनेक जाणकारांनी आजी-माजी क्रिकेटपटूंनी (Cricket) आपली मते मांडली आहेत. भारतीचे माजी यष्टीरक्षक किरण मोरे यांनी भारतीय संघाच्या भावी कर्णधाराबाबत भाष्य केले आहे. 

ते म्हणाले, आगामी इंग्लंड दौऱ्यानंतर म्हणजेच टी-20 विश्वचषकापूर्वी भारताचा पुढील कर्णधार कोण असेल ते स्पष्ट होईल. याशिवाय असेही होऊ शकते विराट स्वतःच कोणत्यातरी एका क्रिकेटच्या प्रकारातील जबाबदारी रोहीतला सोपवू शकतो. मला विश्वास आहे, रोहितला लवकरच भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. आणखी किती दिवस विराट वन डे आणि टी-20  मध्ये नेतृत्व करणार, ज्यावेळी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावरुन परत येईल त्यावेळी याबाबत निर्णय घ्यावाच लागेल. 

विराट कोहलीचा 'क्वारंटाईन लूक' व्हायरल; पाहा फोटो

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात एकाच कर्णधाराने भारतीय संघाचे नेतृत्व करणे सोपे नाही. कारण नेतृत्वाबरोबर चांगली कामगिरी करण्यावर फोकस करावा लागतो. त्यामुळे एकवेळ अशी येईल की विराट स्वतःहून म्हणेल, बस अता खूप झाले रोहितला संघाचे नेतृत्व करु द्या. असे किरण मोरे यांनी स्पष्ट केले. 

रोहितला आयपीएलमधील मुंबई संघाचा यशस्वी कर्णधार म्हणून म्हणले जाते. त्याच्या नेतृत्वात मुंबईने 5 वेळेस आयपीएलवर आपली मोहोर उमटविली आहे. यात त्याने धोनीला देखील मागे टाकले आहे. रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघाने निदाहास ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते.  

संबंधित बातम्या