Virat Kohli बनला 150 millions Instagram followers भारतातील पहिला खेळाडू

जगातील खेळाडूंच्या यादीत रोनाल्डो, मेस्सी व नेमार नंतर (Virat Kohli) ४थ्या क्रमांकावर
Virat Kohli बनला 150 millions Instagram followers भारतातील पहिला खेळाडू
Virat Kohli बनला 150 millions Instagram followersDainik Gomantak

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या खराब फॉर्मशी झगडत असेल, पण असे असूनही, त्याचे फॅन फॉलोइंग मात्र जगभरात कोणत्याही प्रकारे कमी झालेले नाही. शुक्रवारी विराटला इन्स्टाग्रामवर 150 दशलक्ष फॉलोअर्स (150 Millions Followers) मिळाले. या टप्प्यावर पोहोचणारा तो पहिला भारतीय खेळाडू बनला आहे.

150 दशलक्ष इंस्टाग्राम फॉलोअर्स मिळवणारा विराट कोहली क्रिकेट जगतातला पहिला क्रिकेटपटू आहे. केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण आशियामध्ये इतके फॉलोअर्स असलेले ते पहिले व्यक्ती आहेत. जर आपण क्रीडा विश्वाबद्दल बोलायचे झाले तर विराटाचे नाव या यादीत चौथ्या क्रमांकावर येते.

Virat Kohli बनला 150 millions Instagram followers
Goa Football: FC GOA चे स्थानिक खेळाडूंस प्राधान्य

फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्सच्या बाबतीत क्रीडा विश्वात प्रथम क्रमांकावर असून, त्याचे 337 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. 260 दशलक्ष फॉलोअर्ससह लिओनेल मेस्सी दुसऱ्या स्थानावर आहे. तर ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमारचे इंस्टाग्रामवर 160 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. यानंतर क्रमांक लागतो तो म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा.

हॉपर एचक्युच्या अनुसार, विराट कोहलीला इन्स्टाग्रामवर मोठ्या संख्येने फॉलोअर्स असल्याचा फायदा मिळतो. इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकण्यासाठी तो पाच कोटींपर्यंत शुल्क आकारतो. असे मानले जाते की 150 मिलियन फॉलोअर्स झाल्यानंतर विराट कोहलीच्या शुल्कात आणखी वाढ होईल .

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com