विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदालाही ठोकला रामराम

विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडल्याची माहिती ट्विट करुन ही माहिती दिली.
विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदालाही ठोकला रामराम
Virat Kohli Dainik Gomantak

विराट कोहलीने शनिवारी भारताच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी निवेदनाद्वारे माहिती दिली. नुकत्याच झालेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून 2-1 असा पराभव झाला होता. कोहलीने ICC T20 विश्वचषकापूर्वी T20 संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर निवडकर्त्यांनी त्याला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवले. आता कोहलीनेही कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले आहे.

सोशल मीडियावर लिहिलेला भावनिक संदेश

विराटने एक निवेदन जारी करून कर्णधारपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली ज्यात तो म्हणाला, “सात वर्षे मी संघाला योग्य दिशेने नेण्याचा खूप प्रयत्न केला. मी माझे काम मनापासून केले आणि काहीही मागे ठेवले नाही. प्रत्येक गोष्टीचा कधी ना कधी अंत होतो आणि आता माझ्या कसोटी कर्णधाराचा प्रवासही संपुष्टात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com