'विराट'नी केलं अजिंक्य रहाणेचं कौतुक

वृत्तसंस्था
सोमवार, 28 डिसेंबर 2020

भारताचा कर्णधार विराट कोहलीनी मेलबर्नमध्ये खेळवल्या जाणाऱ्या 'बॉक्सिंग डे' टेस्टमधल्या दमदार खेळीनंतर टीम इंडियाचं कौतुक केलं. विराट सध्या पितृत्वाच्या रजेसाठी दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतला आहे.  

मेलबर्न :   भारताचा कर्णधार विराट कोहलीनी मेलबर्नमध्ये खेळवल्या जाणाऱ्या 'बॉक्सिंग डे' टेस्टमधल्या दमदार खेळीनंतर टीम इंडियाचं कौतुक केलं. विराट सध्या पितृत्वाच्या रजेसाठी दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतला आहे.  विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे टीम इंडियाचा कर्णधार आहे. उर्वरित कसोटी सामन्यांमध्येदेखील अजिंक्य भारताचं सक्षम नेतृत्व करेल, असा विश्वास विराट कोहलीनी दाखवला.

पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या पराभवानंतर आता अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात चांगली खेळी केली. जसप्रीत बुमराहच्या दमदार गोलंदाजीमुळे १९५ धावांवर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव गुंडाळला. तसंच, अजिंक्या रहाणेनेगेखील सुरेख खेळी करत त्याचं १२वं कसोटी शतक साजरं केलं. भारताच्या या कामगिरीबद्दल अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाचंदेखील कौतुक केलं जात आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली मायदेशी परतल्यामुळे बाकी सर्व सामन्यांसाठी अजिंक्य भारताचा कर्णधार आहे.
 

संबंधित बातम्या