ICC ODI Ranking: किंग कोहली पुन्हा टॉप 5 फलंदाजांमध्ये, गिल-सिराजचीही गरुडझेप

ताज्या आयसीसी वनडे क्रमवारीत विराट-गिलने मोठी झेप घेतली आहे.
Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak

ICC ODI Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने गुरुवारी वनडे क्रमवारी जाहीर केली आहे. या ताज्या क्रमवारीत भारताचा फलंदाज विराट कोहलीने पहिल्या पाच फलंदाजांमध्ये पुन्हा स्थान मिळवले आहे. तसेच मोहम्मद सिराज, शुभमन गिल आणि कुलदीप यादव यांनाही क्रमवारीत बढती मिळाली आहे.

विराटने दोन स्थानांची प्रगती केली आहे, त्यामुळे तो 750 रेंटिंगसह चौथ्या क्रमांकावर आला आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत दोन शतकांसह 283 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याला त्याचा फायदा झाला आहे.

Virat Kohli
ICC Test Ranking: टीम इंडियाकडून अवघ्या तीन तासात ऑस्ट्रेलियाने हिरावला 'नंबर वन'चा ताज!

फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या पाच जणांमध्ये अव्वल क्रमांकावर 887 रेटिंगसह पाकिस्तानचा बाबर आझम आहे. त्याचपाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा रस्सी वॅन डर द्युसेन (766) आणि क्विंटॉन डी कॉक (759) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

विराटला त्याच्यातील आणि वरील तीन क्रमांकावरील फलंदाजांमध्ये असलेला फरक कमी करण्याची संधी न्यूझीलंडविरुद्धच्या चालू वनडे मालिकेत असणार आहे.

गिलनेही श्रीलंकेविरुद्ध एक शतक आणि एक अर्धशतक ठोकले होते. त्यामुळे तो देखील 10 स्थानांची झेप घेत 26 व्या क्रमांकावर आला आहे. दरम्यान, त्याने न्यूझीलंडविरुद्ध बुधवारी झालेल्या वनडे सामन्यात द्विशतक केले आहे, येत्या काळात त्याचाही त्याला फायदा होऊन तो आणखी मोठी झेप क्रमवारीत घेऊ शकतो.

तसेच फलंदाजी क्रमवारीत सध्या विराटव्यतिरिक्त अव्वल 10 जणांमध्ये भारताचा रोहित शर्माही आहे. तो 10 व्या क्रमांकावर आहे.

Virat Kohli
ICC T20 Rankings: ICC T20 क्रमवारीत भारतीय खेळाडूंची चलती, ईशान किशनची धाकड कामगिरी

दरम्यान, गोलंदाजी क्रमवारीचा विचार करायचा झाल्यास श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीचा त्यांना फायदा झाला आहे. सिराजने या मालिकेत सर्वाधिक 9 विकेट्स घेतल्या होत्या.

त्यामुळे त्याने तब्बल 15 स्थानांची झेप घेतली असून तो आता गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याचे आता 685 रेटिंग झाले आहेत. हे त्याचे कारकिर्दीतील सर्वोच्च रेटिंग आहे.

या क्रमवारीत आता त्याच्या पुढे ट्रेंट बोल्ट आणि जोश हेजलवूड आहे. बोल्ट 730 रेटिंगसह अव्वल क्रमांकावर आहे, तसेच हेजलवूड 727 रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. गोलंदाजांच्या या क्रमवारीत कुलदीपने सात स्थानांची प्रगती केली असून तो 21 व्या क्रमांकावर आला आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध 2 वनडेत 5 विकेट्स घेतल्या होत्या.

आता भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका खेळत असल्याने दोन्ही संघांच्या खेळाडूंना क्रमवारीत बदल घडवण्याची संधी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com