Virat Kohli Bowled: विराट नुसतीच बॅट फिरवत राहिला, मदुशंकाने उडवल्या बेल्स- Video

India vs Sri Lanka Super 4 Round Match: श्रीलंकेविरुद्ध सुपर-4 फेरीच्या सामन्यात अनुभवी फलंदाज विराट कोहली फार काही करु शकला नाही.
Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak

Virat Kohli bowled, India vs Sri Lanka Super 4 Round Match: श्रीलंकेविरुद्ध सुपर-4 फेरीच्या सामन्यात अनुभवी फलंदाज विराट कोहली फार काही करु शकला नाही. खाते न उघडताच तो पॅव्हेलियनमध्ये परतला. दुबईत होत असलेल्या या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. तर दुसरीकडे, दिलशान मदुशंकाने डावाच्या तिसऱ्या षटकात विराटला बाद करत संघाला मोठे यश मिळवून दिले.

विराट केवळ 4 चेंडू खेळू शकला

विराट कोहली (Virat Kohli) तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला, तेव्हा केएल राहुलला महेश थिकशनाने एलबीडब्ल्यू करुन पॅव्हेलियनमध्ये पाठवले. दिलशान मदुशंकाच्या तिसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर विराटने लाँग शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने बॅटही वेगाने फिरवली, परंतु चेंडू सरळ स्टम्पला जावून लागला. मदुशंकासोबतच संपूर्ण श्रीलंकन संघाने जल्लोष केला. विराटने 4 चेंडूंचा सामना केला पण खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला.

Virat Kohli
आशिया चषक 2022 श्रीलंकेतून UAE मध्ये हलवण्याची शक्यता

आशिया कपमध्ये विराट कोहलीची दमदार कामगिरी

विराट कोहलीने आशिया चषक स्पर्धेत आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या (Pakistan) साखळी सामन्यात त्याने 35 धावा केल्या होत्या. यानंतर त्याने हाँगकाँगविरुद्ध 59 धावांची नाबाद खेळी खेळली. कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या सुपर- 4 फेरीच्या सामन्यात त्याने 60 धावा केल्या. मात्र, टीम इंडियाला 5 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.

Virat Kohli
Asia Cup: सौरव गांगुलींची मोठी घोषणा, आशिया चषक यूएईमध्ये होणार

भारताला फक्त विजयाची गरज आहे

जर भारतीय संघाला आशिया चषक-2022 (Asia Cup-2022) च्या अंतिम फेरीत पोहोचायचे असेल, तर त्यांना श्रीलंकेला (Sri Lanka) कोणत्याही परिस्थितीत हरवावे लागेल. भारतीय संघाने साखळी टप्प्यातील दोन्ही सामने जिंकले आहेत. शीर्षस्थानी असताना सुपर-4 फेरीत प्रवेश केला. सुपर-4 फेरीत भारताला पुन्हा पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. भारताला आता श्रीलंका आणि अफगाणिस्तानविरुद्ध खेळायचे आहे. टीम इंडियाला (Team India) अंतिम फेरी गाठायची असेल, तर त्याला कोणत्याही परिस्थितीत दोन्ही सामने जिंकावेच लागतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com