Virat Kohli: नववर्ष 'किंग कोहलीचं', क्रिकेटच्या देवाचा मोडणार वर्ल्ड रेकॉर्ड?

विराट कोहलीला 2023 मध्ये सचिन तेंडुलकरचा मोठा विश्वविक्रम मोडण्याची संधी.
Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak

Virat Kohli: साल 2022 संपून आता नवीन 2023 वर्षाला सुरुवात झाली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध मर्यादीत षटकांचे सामने खेळायचे आहे. हे संपूर्ण वर्षच भारतीय संघासाठी व्यस्त ठरणार आहे. कारण, जवळपास प्रत्येक महिन्यात भारतीय खेळाडू सामने खेळणार आहेत.

तसेच या वर्षात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दरम्यान वनडे वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. त्यादृष्टीने या वर्षात अनेक वनडे मालिका खेळवल्या जाणार आहेत. त्यामुळे भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहलीला मोठा विक्रम करण्याची संधी आहे. तो मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडू शकतो.

Virat Kohli
Virat on Ronaldo: विराटची रोनाल्डोसाठी इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'तू माझ्यासाठी...'

सचिनचा विक्रम मोडण्याची विराटला संधी

विराटने त्याच्या कारकिर्दीत 265 वनडे सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 12471 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याच्या 44 शतकांचा समावेश आहे. त्यामुळे त्याने यावर्षात वनडे कारकिर्दीत 6 किंवा त्यापेक्षा अधिक शतके केली, तर तो सचिन तेंडुलकरला सर्वाधिक वनडे शतके करण्याच्या यादीत मागे टाकेल. तसेच तो 50 वनडे शतके करणारा पहिलाच फलंदाज देखील ठरेल.

सध्या वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या यादीत सचिन तेंडुलकर 49 शतकांसह अव्वल क्रमांकावर आहे. तसेच विराट 44 शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Virat Kohli
Virat Kohli Viral Video: किंग कोहली आऊट होताच भडकला, पॅव्हेलियनकडे परतत असताना...

तसे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटने आत्तापर्यंत 71 शतके केली असून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्येही तो सचिन पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके केली आहेत.

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे क्रिकेटपटू -

49 शतके - सचिन तेंडुलकर

44 शतके - विराट कोहली

30 शतके - रिकी पाँटिंग

29 शतके - रोहित शर्मा

28 शतके - सनथ जयसूर्या

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com