त्यानंतर विराटने केले सूर्यकुमार यादवचे अभिनंदन

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

संघाला एकहाती लोळवणाऱ्या सूर्यकुमारला विराटने दिलेली ‘खुन्नस’ चर्चेत आली होती, परंतु त्या प्रसंगाची माहिती सूर्यकुमारने उघड केली. सामना संपल्यानंतर विराट ‘नॉर्मल’ झाला, तो माझ्याजवळ आला आणि माझे अभिनंदन केले.

नवी दिल्ली : संघाला एकहाती लोळवणाऱ्या सूर्यकुमारला विराटने दिलेली ‘खुन्नस’ चर्चेत आली होती, परंतु त्या प्रसंगाची माहिती सूर्यकुमारने उघड केली. सामना संपल्यानंतर विराट ‘नॉर्मल’ झाला, तो माझ्याजवळ आला आणि माझे अभिनंदन केले. वेल प्लेड असेही तो म्हणाला असल्याची माहिती सूर्यकुमारने जाहीर केली.

मुंबई इंडियन्सच्या या पाचव्या विजेतेपदामध्ये सर्वच खेळाडूंनी आलटून पालटून योगदान दिले, परंतु सूर्यकुमार यादवने उमटवलेला ठसा चर्चेत राहिला. बंगळूरविरुद्धच्या सामन्यात मुंबईने सुरुवातीचे फलंदाज गमावल्यानंतर सूर्यकुमार खंबीरपणे उभा राहिला आणि त्याने लाजवाब फटकेबाजी करून सर्वांचेच पारणे फेडले होते. सूर्यकुमारच्या या फलंदाजीमुळे आपल्या हातून सामना निसटत असल्याची जाणीव विराट कोहलीला झाली होती. त्यामुळे त्याचा एक फटका अडवल्यानंतर विराट थेट सूर्यकुमारच्या दिशेने रागारागत गेला. सूर्यकुमारनेही त्याच्या नजरेला नजर दिली होती. सामना संपल्यानंतर विराट सर्वकाही विसरला असल्याचे सूर्यकुमारने सांगितले.

संबंधित बातम्या

Tags