गोंधळ निर्माण होत असल्याचे म्हणत 'डीआरएस'वरून विराट कोहली भडकला

Virat and DRS
Virat and DRS

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आज डिसिजन रिव्यू सिस्टिमवर पुन्हा एकदा टीका केली आहे. विराट कोहलीने (Virat Kohli) डीआरएसच्या अंपायर्स कॉल संदर्भात बोलताना यामुळे बर्‍याच वेळेस गोंधळाचे वातावरण होत असल्याचे म्हटले आहे. पायचीत बाद होण्याचा निर्णय हा पूर्णपणे चेंडू स्टॅम्पला लागत आहे की नाही या आधारावर असणे गरजेचे असल्याचे मत विराट कोहलीने व्यक्त केले आहे. सध्याच्या स्थितीला चेंडू तीन स्टॅम्प पैकी एकाला तरी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक लागत असेल तरच मैदानातील अंपायर यांच्या निर्णयाच्या विरोधात आव्हान दिले जाऊ शकते.

भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी आणि टी-ट्वेन्टी मालिकेनंतर आता तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. आणि या मालिकेपूर्वी विराट कोहलीने पत्रकार परिषदेत बोलताना, डीआरएस (DRS) नसतानाही बराच काळापासून खेळत असल्याचे सांगितले. व त्यावेळी अंपायर यांनी दिलेला निर्णय फलंदाजाला आवडो अगर न आवडो हा निर्णय शेवटपर्यंत तोच राहत असल्याचे सांगितले. याउलट मैदानातील अंपायर यांनी फलंदाज बाद असताना देखील नाबाद दिल्यास त्याला बाद हा निर्णय देणे गरजेचे असल्याचे विराट कोहलीने सांगितले. व आताच्या स्थितीला अंपायर्स कॉल हा गोंधळ निर्माण करत असल्याचे विराटने पुढे नमूद केले. 

याशिवाय, एक फलंदाज म्हणून फलंदाजी करत असताना आपल्याला चेंडू किती टक्के स्टम्पला लागलेला आहे हे माहित नसते. आणि त्यामुळे यावर चर्चा व्हायला हवी असे आपल्याला वाटत नसल्याचे म्हणत, जर चेंडू स्टंपला स्पर्श करत असेल तर फलंदाज बाद पाहिजे, व भलेही फलंदाजाला हे आवडले असो वा नसो, असे विराटने सांगितले. शिवाय, यामुळे क्रिकेट हा खेळ सोपा राहणार असल्याचे विराट कोहलीने पुढे अधोरेखित केले. चेंडू स्टंप्सला लागत आहे की नाही यावरूनच निर्णय होणे आवश्यक असल्याचे विराट कोहली म्हणाला. आणि यामुळे चेंडू स्टॅम्पला किती टक्के लागत आहे हे पाहणे गरजेचे नसल्याचे त्याने सांगितले. 

परंतु, अंपायर्स कॉल मध्ये नेमके याच प्रकारच्या गोष्टींमुळे शंका निर्माण होत असल्याचे विराट कोहलीने म्हटले आहे. आणि या प्रकारचा सॉफ्ट सिग्नल राहावा जेणेकरून, एखाद्या मोठ्या स्पर्धेत मोठ्या टप्प्यावर अशी चूक झाली असेल तर कोणत्याही संघाला याच्या नुकसानाला सामोरे जावे लागू शकते, असे विराट कोहलीने म्हटले.     

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com