Virat on Ronaldo: विराटची रोनाल्डोसाठी इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'तू माझ्यासाठी...'

विराट कोहलीने रोनाल्डोसाठी सोमवारी एक खास पोस्ट केली आहे.
Cristiano Ronaldo and Virat Kohli
Cristiano Ronaldo and Virat KohliDainik Gomantak

Virat on Ronaldo: भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी सोमवारी एक खास पोस्ट शेअर केली आहे. पोर्तुगाल संघ फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर विराटने ही पोस्ट केली आहे. त्यामुळे त्याची पोस्ट सध्या चर्चेत आहे.

कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धा रोनाल्डोची अखेरची वर्ल्डकप स्पर्धा असल्याचे म्हटले जात होते. त्याचमुळे तो वर्ल्डकप विजयाचे स्वप्न साकार करणार का, याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, तसे झाले नाही आणि पोर्तुगालचा संघ उपांत्यपूर्व फेरीनंतर स्पर्धेतून बाहेर पडला.

पोर्तुगालला उपांत्यपूर्व फेरीत मोरोक्को विरुद्ध 1-0 अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवानंतर रोनाल्डोही भावूक झाला होता. त्याचा रडतानाचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.

त्यानंतर आता विराटने रोनाल्डोसाठी भावनिक पोस्ट केली असून त्यात लिहिले आहे की, 'कोणतीही ट्रॉफी किंवा जेतेपद तू जे खेळासाठी आणि जगभरातील चाहत्यांसाठी केले आहे, ते हिरावून घेऊ शकत नाही.'

'कोणतेही जेतेपद लोकांवर तुझा किती प्रभाव आहे आणि माझ्याबरोबरच जगभरातील लोकांना तुला खेळताना पाहताना काय वाटते, हे स्पष्ट करू शकणार नाही. ही तुला दैवाने दिलेली भेट आहे. जो व्यक्ती मनापासून प्रत्येक सामना खेळतो, जो मेहनतीचे आणि समर्पणाचे प्रतिक आहे आणि कोणत्याही खेळाडूसाठी प्रेरणा आहे, त्याच्यासाठी हा आशिर्वादच आहे. तू माझ्यासाठी सर्वकालिन सर्वोत्तमच आहेस.'

विराट रोनाल्डोचा चाहता आहे, हे काही लपून राहिलेले नाही. यापूर्वीही विराटने रोनाल्डोसाठी अनेकदा पोस्ट केले आहेत.

रोनाल्डो आत्ता 37 वर्षांचा आहे, त्यामुळे आता तो 2026 साली होणारा वर्ल्डकप खेळेल की नाही, यावर प्रश्नचिन्ह आहे. त्याला फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेतही उपांत्यपूर्व सामन्यात सुरुवातीच्या 11 जणांच्या संघात संधी देण्यात आली नव्हती. तो या सामन्यात सब्स्टिट्यूटच्या रुपात उतरला होता. पण त्याने त्यावेळी सर्वाधिक 196 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम केला होता.

विराटबद्दल सांगायचे झाल्यास तो सध्या भारतीय संघासह बांगलादेश दौऱ्यावर आहे. त्याने या दौऱ्यातील तिसऱ्या वनडेत शतकी खेळी केली होती. हे त्याचे 72 वे आंतरराष्ट्रीय शतक होते. या शतकासह त्याने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके करण्याच्या विक्रमात रिकी पाँटिंगला मागे टाकले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com