पुणे: एकदिवसीय मालिकेचे 2 सामने झाले आहे. पहिल्यांदा हा संघ जिंकला तर ती गोष्ट चव्हाट्यावर आली नाही. पण दुसऱ्या सामन्यात 336 धावांचे टारगेट करूनसुध्दा भारतीय संघ हरला म्हणून लपलेली बाब समोर आली. हार्दिक पंड्या गोलंदाजी का करत नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ना त्याला दुखापत झाली, ना तो अनफिट आहे, मग का? एकदिवसीय मालिकेआधीही हार्दिकने टी-20मालिकेत चांगली गोलंदाजी केली होती, मग त्याने वन डे मालिकेत आपल्या गोलंदाजीचा चमत्कार का दाखविला नाही? विशेषत: जेव्हा टीम इंडिया दुसर्या एकदिवसीय सामन्यात अडचणीत सापडली होती, तेव्हा कर्णधार कोहलीने आपला हा हुकमाचा एक्का का वापरला नाही? असे प्रश्न बरेच आहेत आणि उत्तर एकच आहे, ते म्हणजे विराट कोहलीची दूरची विचारसरणी.
होय, विराट कोहलीची ही दूरगामी विचारसरणी आहे, ज्याने हार्दिक पांड्याला वनडे मालिकेत गोलंदाजीपासून रोखले आहे. क्रिकेटच्या या कलेत आपल्या सर्व गंमती दाखविण्यापासून त्याला दूर ठेवले गेले आहे. असं खुद्द विराट कोहलीने कबूल केलं आहे. दुसर्या एकदिवसीय सामन्यात मोठा स्कोर बनवून देखील पराभवाचा सामना करावा लागला. तेव्हा भारतीय कर्णधार विराट कोहलीला हार्दिकच्या गोलंदाजीबद्दल विचारले गेले तेव्हा त्याने त्यामागील कारण सांगितले, टीम इंडियाची ही भावी योजना आहे, असं म्हणत त्याने उत्तर दिले.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कोरोना पॉझिटिव्ह
हार्दिकच्या गोलंदाजी न करण्यामागील विराटची दूरगामी विचारसरणी
"हार्दिक हा आमच्या संघाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अशा परिस्थितीत आपण त्यांचे शरीर चांगले व्यवस्थापित करावे लागेल. त्यांची गरज कोठे आहे हे आम्हाला समजून घेतले पाहिजे. आम्ही हार्दिकचा टी -20 मध्ये उपयोग केला, पण त्याच्या कामाचे ओझे वनडेमध्ये व्यवस्थापित केले जात आहे. आम्हाला भविष्यात इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेट खेळावे लागणार आहे. त्यामुळे आमच्यासाठी तो पूर्ण तंदुरुस्त असणे फार महत्वाचे आहे," असे विराट कोहली म्हणाला.
INDvsENG: धावांचा डोंगर उभारूनही भारताचा बेरंग; इंग्लंडने उधळले विजयी रंग
इंग्लंडमध्ये डब्ल्यूटीसी, हार्दिक महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार
भारतीय कर्णधार कोहली इंग्लंडमधील आयपीएल नंतर होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंदाज घेत असल्याचं स्पष्ट झाले आहे. त्यांला हे देखील माहित आहे की जर आत्ता आयपीएल आहे तर हार्दिकची गोलंदाजी तिथेही वापरली जाऊ शकते. हेच कारण आहे की भारतीय संघ व्यवस्थापनाने त्यांच्या कामाच्या बोजामुळे त्यांना गोलंदाजीपासून दूर ठेवले आहे.
होळी निमित्त घेवून येतोय Sakal Holi Beats 2k21 कार्यक्रमाची मेजवानी; पहा टिझर