सिडनीत फिरताना कर्णधार 'विराट कोहली' आणि 'हार्दिक पांड्याने' देखील केेले बबल मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन

वृत्तसंस्था
सोमवार, 4 जानेवारी 2021

सिडनीत एका लहान बाळांच्या दुकानात मास्क न घालता फिरताना डिसेंबरमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या जैवसुरक्षा निर्बंधाचा भंग केला होता.

सिडनी  : सिडनीत एका लहान बाळांच्या दुकानात मास्क न घालता फिरताना डिसेंबरमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या जैवसुरक्षा निर्बंधाचा भंग केला होता, अशी माहिती सिडनी मॉर्निंग हेराल्ड आणि द एज यांनी दिली. बबल मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन यामुळे झाले होते, तरी ही बाब भारतीय क्रिकेट टीमच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्षित करण्यात आल्याचं म्हटलं गेलंय.

वाद निर्माण करण्याचा नवा प्रयत्न

बंदिस्त रेस्टॉरंटमध्ये पाच खेळाडूंनी भोजन घेत जैवसुरक्षा नियमाचा भंग केल्याचे प्रकरण ताजे असताना सिडनी ‘मॉर्निंग हेराल्ड’ने विराट कोहली आणि हार्दिक पंड्याने सिडनीत ५ डिसेंबरला मास्क न घालता, तसेच सुरक्षित अंतराचे पालन न केल्याची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. एवढेच नव्हे तर त्यानंतर एका आठवड्यांनी भारतीय खेळाडू बंदिस्त रेस्टॉरंटमध्ये जाऊन ऑर्डर दिली, पण पदार्थांचा आस्वाद खुल्या जागेत घेतला, असा दावा केला आहे. ऑर्डर देण्यास जातानाही खेळाडूंनी मास्क परिधान न केल्याचा दावा करण्यात आला.

 

भारतीय संघातील कसोटीपटूंनी मेलबर्नला जैवसुचा भंग करत मॉलमधील रेस्टॉरंटमध्ये भोजन केले होते. त्यामुळे या सर्व पाचही खेळाडूंना विलगीकरणात ठेवले असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केलं होतं. उपकर्णधार रोहित शर्मासह भारतीय संघातील पाच खेळाडूंचे शॉपिंग सेंटरमधील रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत असल्याचे छायाचित्र ट्विट झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. सिडनीत कोरोनाचे रुग्ण वाढत असताना तिथे कसोटीचे आयोजन किती सुरक्षित असेल याची चर्चा होत असतानाच हे छायाचित्र प्रसिद्ध झाले. रोहित शर्मा, रिषभ पंत, शुभमन गिल, नवदीप सैनी, पृथ्वी शॉ यांनी चॅडस्टोन शॉपिंग सेंटरमधील सिक्रेट किचन या चायनीज नूडल आणि बीबीक्‍यू रेस्टॉरंटमध्ये गेल्याचे ऑस्ट्रेलियातील वर्तमानपत्रांनी म्हटलं होतं. यानंतर या पाचही खेळाडूंसह संपूर्ण टीम इंडियाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने आता हे खेळाडू तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकतील.

 

अधिक वाचा :

INDvsAUS रोहित शर्मासह त्या चारही खेळाडूंच्या कोरोना चाचणीचे रिपोर्टस्.

संबंधित बातम्या