Most sixes In T20: कोहलीने रचला इतिहास, भारताचा ठरला दुसरा सिक्सर 'किंग'

कोहली (Virat Kohli) आता T20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.
Most sixes In T20: कोहलीने रचला इतिहास, भारताचा ठरला दुसरा सिक्सर 'किंग'
Virat KohliDainik Gomantak

Most sixes In T20 Cricket: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल 2022 च्या 49 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा 13 धावांनी पराभव करुन यंदाच्या मोसमातील सहावा विजय नोंदवला. बंगळुरुच्या या विजयात विराट कोहली (Virat Kohli), कर्णधार फाफ डू प्लेसिस, महिपाल लोमरोर आणि दिनेश कार्तिक या फलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात किंग कोहलीने 33 चेंडूत 30 धावा केल्या. सलामीला आलेल्या कोहलीने या खेळीदरम्यान तीन चौकार आणि एक षटकार लगावला. या एका षटकाराच्या जोरावर किंग कोहली आता भारताचा दुसरा सिक्सर किंग बनला आहे. (Virat Kohli has become the second Indian to hit the most number of sixes in T20 cricket breaking Suresh Raina's record)

दरम्यान, कोहली आता T20 क्रिकेटच्या (T20 Cricket) इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने या बाबतीत सुरेश रैनाचा विक्रम मोडला आहे. याआधी, टी-20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा रैना हा दुसरा भारतीय खेळाडू होता. कोहलीने 2007 पासून आतापर्यंत 336 सामन्यांच्या 319 डावांमध्ये 325 षटकार मारले आहेत. RCB आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा जगातील 23वा खेळाडू ठरला आहे. यामध्ये रोहित जगातील सातवा फलंदाज ठरला आहे.

Virat Kohli
टीम इंडिया टी-20 मधून विराट कोहली पडणार बाहेर?

तसेच, रैनाच्याही तितक्याच सामन्यांमध्ये 325 षटकार आहेत, मात्र आता विराटने त्याला मागे टाकले आहे. भारताला दोन विश्वचषक जिंकून देणारा भारताचा माजी कर्णधार आणि जगातील सर्वोत्तम फिनिशर महेंद्रसिंग धोनीने (Mahendra Singh Dhoni) आतापर्यंत 356 सामन्यांत 310 षटकार ठोकले आहेत. टी-20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा धोनी आता चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे.

Virat Kohli
IPL 2022: किंग कोहली आला बस्स... हीच बातमी आहे

रोहित शर्मा सर्वाधिक षटकारांसह भारतीय

टीम इंडियाचा (Team India) सध्याचा कर्णधार रोहित शर्मा हा T20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारा भारतीय फलंदाज आहे. रोहितने आतापर्यंत 379 सामन्यांच्या 366 डावांमध्ये 429 षटकार मारले आहेत. त्याचबरोबर टी-20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आजही 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने आतापर्यंत 463 सामन्यांच्या 453 डावांमध्ये 1056 षटकार मारले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.