Virat Kohli: विराट कोहलीचे बल्ले-बल्ले, 40 महिन्यांनंतर करिअरमध्ये आला 'हा' खास क्षण

IND vs AUS 4th Test Match: टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीची अहमदाबाद कसोटीत धमाकेदार खेळी पाहायला मिळाली.
Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak

IND vs AUS 4th Test Match: टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीची अहमदाबाद कसोटीत धमाकेदार खेळी पाहायला मिळाली.

विराटने 3 वर्षांनंतर 100 धावांचा टप्पा पार केला. हे त्याचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 28 वे कसोटी शतक आहे. हा सामना बरोबरीत संपला असला तरी विराटसाठी हा सामना खूप खास होता. कसोटी क्रिकेटमध्ये 40 महिन्यांनंतर त्याला एक आनंदाची बातमी मिळाली आहे.

40 महिन्यांनंतर करिअरमध्ये हा खास क्षण आला

विराट कोहलीने (Virat Kohli) या सामन्यात 364 चेंडूत 15 चौकारांसह 186 धावा केल्या. या शानदार खेळीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये 40 महिन्यांनंतर सामनावीर ठरला आहे.

कोहलीने बांगलादेशविरुद्ध नोव्हेंबर 2019 मध्ये शेवटचे शतक झळकावून कसोटी क्रिकेटमधील शतकाचा तीन वर्षांचा दुष्काळ संपवला. सामन्यानंतर विराट म्हणाला की, एक खेळाडू म्हणून माझ्याकडून असलेल्या अपेक्षा अधिक महत्त्वाच्या आहेत.

Virat Kohli
IND vs AUS: टीम इंडियाने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील पहिला देश

सामनावीर ठरल्यानंतर केले मोठे वक्तव्य

विराट कोहली म्हणाला की, 'खेळाडू म्हणून माझ्याकडून असलेल्या अपेक्षा माझ्यासाठी अधिक महत्त्वाच्या आहेत. मला वाटते की, कसोटी क्रिकेटमध्ये मी माझ्या वेगाने खेळू शकलो नाही. तो पुढे म्हणाला, 'नागपूरमधील (Nagpur) पहिल्या डावापासून मी खरोखरच चांगली फलंदाजी करत असल्याचे मला वाटले. पण आम्ही संघासाठी जास्तीत जास्त फलंदाजी करण्यावर अधिक भर दिला.'

Virat Kohli
IND vs AUS: विराटचं द्विशतक हुकलं, पण ऑस्ट्रेलियन टीमच्या खिलाडूवृत्तीनं मन जिंकलं, पाहा Video

ऑस्ट्रेलियाविरुद्धची सर्वात मोठी खेळी

186 ही विराट कोहलीची ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिका 2-1 ने जिंकण्यासाठी भारताने अहमदाबादमध्ये बरोबरी साधली.

कोहली आता 17 मार्चपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय संघात दिसणार आहे. दोन्ही संघांमध्ये या मालिकेत एकूण 3 एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com