विराट कोहली मायदेशातूनही टिम इंडियाला करणार चिअर अप..!

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 22 डिसेंबर 2020

फलंदाजीतील अतिशय लाजिरवाणी कामगिरी आणि त्यामुळे झालेला मानहानीकारक पराभव अशा संकटात सापडलेल्या टीम इंडियाची साथ विराट कोहली सोडणार असला तरी त्याने मायदेशी रवाना होण्यापूर्वी तो संघाबरोबर एका खास बैठकीतून प्रत्येक खेळाडूचे मनोबल उंचावणारे मनोगत व्यक्त  करणार आहे.

ॲडलेड :  फलंदाजीतील अतिशय लाजिरवाणी कामगिरी आणि त्यामुळे झालेला मानहानीकारक पराभव अशा संकटात सापडलेल्या टीम इंडियाची साथ विराट कोहली सोडणार असला तरी त्याने मायदेशी रवाना होण्यापूर्वी तो संघाबरोबर एका खास बैठकीतून प्रत्येक खेळाडूचे मनोबल उंचावणारे मनोगत व्यक्त  करणार आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी संघाला पराभूत मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी या विशेष बैठकीची रचना संकल्पना तयार केली आहे. त्यानंतर सर्व खेळाडूंशी एकत्रितपणे संवाद साधल्यानंतर विराटने प्रत्येक खेळाडूची वैयक्तिक भेट घेऊन त्यांना मनोबल वाढविण्यावर भर देणार आहे. या बैठकीत विराटने प्रत्येक खेळाडूला त्याच्या जबाबदारीचीही आठवण करून देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आपण पहिली कसोटी वाईट पद्धतीने पराभूत झालो असलो तरी अजून तीन सामने शिल्लक आहेत. या सामन्यांसाठी खेळाडूंचे मनोबल सक्षम राहाण्यासाठी विराटचे हे मनोगत महत्त्वाचे ठरू शकेल. कर्णधार म्हणून तो आता खेळाडूंच्या सोबत नसला तरी त्याने साधलेला संवाद स्फूर्तिदायी ठरेल, असे सूत्रांनी सांगितले. पुढील तीन सामन्यांसाठी विराटकडून कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारणारा अजिंक्‍य रहाणेही या विशेष बैठकीत सहकाऱ्यांशी संवाद साधणार आहे. तो सुद्धा प्रत्येक खेळाडूकडून कोणकोणते योगदान हवे आहे यावर भाष्य करणार आहे.पहिला कसोटी सामना पराभूत झाल्यानंतर आठवड्यानंतर दुसरा सामना सुरू होणार आहे, त्यामुळे पराभूत मानसिकतेतून बाहेर येण्यास भारतीय खेळाडूंकडे पुरेसा वेळ आहे. या सामन्यासाठी संघात चार ते पाच बदल होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. विराट आणि दुखापतीमुळे मालिकेबाहेर गेलेला महम्मद शमी हे दोन बदल तर निश्‍चित आहेत.

 

व्हॉटसॲपवरून संपर्क

संघातील प्रत्येकाचा समावेश असलेला एक व्हॉटसॲप ग्रुप आहे. विराट मायदेशी परतणार असला तरी या ग्रुपवरून तो प्रत्येकाशी संपर्क साधणार आहे. संवाद कायम ठेवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या