Virat Kohli: कोहलीचं 'विराट' दु:ख! चक्क नवाकोरा मोबाईलच हरवला, म्हणतोय, 'कोणी पाहिलाय का'?

विराटने मोबाईल हरवल्याचं सांगताच सोशल मीडियावर त्याला भन्नाट कमेंट्स येत आहेत.
Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak

Virat Kohli: कोणताही व्यक्ती कितीही मोठा झाला तरी आपली एखादी गोष्ट हरवली, तर त्याला वाईट वाटतेच. त्यातही ती गोष्ट नवीन असेल, तर त्याचं दु:ख अधिक असतं. असेच दु:ख विराट कोहलीलाही झालं आहे. त्याचा नवाकोरा मोबाईल हरवला आहे.

विराटने त्याचा मोबाईल हरवल्याबद्दल स्वत: माहिती दिली आहे. त्याने ट्वीट केले आहे की 'तुमचा बॉक्सही न उघडलेला नवाकोरा मोबाईल हरवल्याच्या दु:खी भावनेला कोणीही हरवू शकत नाही. कोणी तो पाहिलाय का?'

Virat Kohli
IND vs AUS: 'हे' खेळाडू गाजवणार बॉर्डर गावस्कर ट्रॉफी, नावावर करणार मोठे रेकॉर्ड

विराटने हे ट्वीट करताच ते मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून हजारो प्रतिक्रियाही त्याला आल्या आहेत. अनेक युजर्सने काही मजेशीर उत्तरंही त्याला दिली आहेत. झोमॅटोने त्याच्या ट्वीटला उत्तर देताना लिहिले आहे की 'वहिनींच्या मोबाईलवरून आईसक्रिम मागवागला कचरू नकोस.'

विराट सध्या नागपूरमध्ये भारतीय कसोटी संघाबरोबर आहे. भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध 9 फेब्रुवारीपासून 4 सामन्यांची कसोटी मालिका (बॉर्डर-गावसकर ट्रॉफी) खेळायची आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे.

या मालिकेसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ नागपूरला पोहचले असून त्यांची तयारी सुरू आहे. दरम्यान, या मालिकेत विराट कोहलीची कामगिरी कशी होणार याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

Virat Kohli
Virat Kohli: 'सितारा...!', किंगकडून प्रिन्सचं विशेष कौतुक! Gillच्या शतकावर विराटची लक्षवेधक कमेंट

विराट सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने या वर्षात आत्तापर्यंत दोन शतकेही केली आहेत. पण ही शतके त्याने वनडेत केली आहेत. तो अद्याप त्याच्या 28 व्या कसोटी शतकाची वाट पाहात आहे. त्याने अखेरचे कसोटी शतक म्हणजेच 27 वे शतक नोव्हेंबर 2019 मध्ये केले होते. त्यानंतर त्याला गेल्या तीन वर्षात कसोटी शतक करता आलेले नाही.

विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत आत्तापर्यंत २० कसोटी सामने खेळले असून 48.05 सरासरीने 1682 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 7 शतके आणि 5 अर्धशतके केली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com