IPL 2021 : यंदाच्या आयपीएल मध्ये कोहलीच्या नावावर होऊ शकतात 'विराट' रेकॉर्डस्  

IPL 2021 : यंदाच्या आयपीएल मध्ये कोहलीच्या नावावर होऊ शकतात 'विराट' रेकॉर्डस्  
Virat Kohli

बहुचर्चित इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेचा यंदाचा हंगाम येत्या 9 एप्रिलपासून सुरु होणार आहे. यावर्षीच्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या दोन संघात पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. शिवाय आयपीएलमध्ये पुन्हा एकदा चाहते विराट कोहलीची फलंदाजी पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहात आहेत. तर विराट कोहली हा सध्याच्या घडीला आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात देखील विराट कोहलीच्या नावावर काही खास विक्रम होऊ शकतात. (Virat Kohli may have some special records in this years IPL)

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या संघाने आयपीएलच्या कारकिर्दीत आतापर्यंत एकदाही खिताब पटकावलेला नाही. मात्र यंदाच्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ एक प्रमुख दावेदार म्हणून पुढे येऊ शकतो. शिवाय यंदाच्या स्पर्धेत चांगल्या फॉर्म मध्ये असलेला विराट कोहली धमाकेदार खेळी करण्याची अपेक्षा चाहत्यांकडून वर्तविण्यात येत आहे. याव्यतिरिक्त, यंदाच्या मोसमात विराट कोहलीकडून काही नवे रेकॉर्डस् होऊ शकतात. 

टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्ये 10,000 धावा - 
विराट कोहली (Virat Kohli) टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्ये 10,000 धावा करण्यापासून केवळ 269 धावा मागे आहे. आणि यंदाच्या हंगामात त्याने 269 धावा केल्यास हा विक्रम त्याच्या नावावर होणार आहे. टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या खात्यात आतापर्यंत 9731 धावा आहेत. त्यामुळे त्याच्या 10,000 धावा झाल्यास टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्ये असा कारनामा करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे. 

आयपीएलमध्ये 6000 धावा -
त्यानंतर, आयपीएलमध्ये 6000 धावा करणारा विराट कोहली पहिला फलंदाज बनू शकतो. आयपीएलमध्ये कोहलीने 5878 धावा केल्या आहेत. आणि फक्त 122 धावा केल्यावर विराट कोहलीच्या नावावर 6000 धावा जमा होणार आहेत. यासोबतच हा विक्रम करणारा विराट कोहली हा पहिला फलंदाज ठरणार आहे. 

आयपीएलमध्ये 200 सामने -
या मोसमात 8 सामने खेळताच कोहली आयपीएलमध्ये (IPL) 200 सामने खेळणारा खेळाडू होईल. आतापर्यंत रोहित शर्मा आणि धोनी यांनी 200 हून अधिक आयपीएल सामने खेळले आहेत. विराट कोहलीने आतापर्यंत आयपीएलमध्ये 192 सामने खेळलेले आहेत. 

अर्धशतकांचे अर्धशतक -
विराट कोहलीने यंदाच्या आयपीएल (IPL2021) मध्ये 6 डावांमध्ये 50 हून अधिक धावा केल्यास आयपीएलच्या इतिहासात अर्धशतकांचे अर्धशतक करण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर जमा होईल.       

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com