Virat Kohli on Ronaldo: 'लोक म्हणत होते...' रोनाल्डोचा 'जबरा फॅन' किंग कोहलीची इमोशनल पोस्ट व्हायरल

विराट कोहलीने ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी शेअर केलेली पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
Virat Kohli | Cristiano Ronaldo
Virat Kohli | Cristiano RonaldoDainik Gomantak

Virat Kohli on Ronaldo: पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचे जगभरात कोट्यावधी चाहते आहेत. यात अनेक सेलिब्रेटिंचाही समावेश आहे. भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीचाही यात समावेश आहे.

विराट रोनाल्डोचा फॅन आहे, ही गोष्ट काही लपून राहिलेली नाही. त्याने रोनाल्डोसाठी अनेकदा पोस्ट शेअर केली आहे. आता पुन्हा एकदा शुक्रवारी त्याने केलेली एक पोस्ट व्हायरल होत आहे.

गुरुवारी रात्री रोनाल्डो सौदी अरेबिया ऑल स्टार इलेव्हन संघ (Riyadh All Star XI) विरुद्ध पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) या संघात झालेल्या सामन्यात खेळला होता. रियाधमधील किंग फाहद आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना झाला.

Virat Kohli | Cristiano Ronaldo
PSG vs Riyadh All Star XI: तब्बल 9 गोलच्या थरारक सामन्यात PSG विजयी, मेस्सी-रोनाल्डोचेही गोल; Video

रोनाल्डोने काही दिवसांपूर्वीच सौदी अरेबियातील अल नासर क्लबशी करार केला आहे. त्यामुळे तो रियाध ऑल स्टार इलेव्हन संघाचा गुरुवारी झालेल्या सामन्यात कर्णधार होता. या सामन्यात लिओनल मेस्सी, नेमार, कायलिन एमबाप्पे यांसारख्या स्टार खेळाडूंचा समावेश असलेल्या पीएसजी संघाने 5-4 असा विजय मिळवला.

पण असे असले तरी रोनाल्डोने त्याच्या खेळाने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने पीएसजीविरुद्ध रियाध ऑल स्टार इलेव्हनकडून दोन गोल केले. त्याच्या या कामगिरीमुळे सामना पराभूत झाल्यानंतरही त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

Virat Kohli | Cristiano Ronaldo
Lionel Messi: विश्वविजेच्या मेस्सीचे PSG संघात ग्रँड वेलकम! नेमारच्या कमेंटनेही वेधले लक्ष

या सामन्यानंतर विराटने इंस्टाग्राम स्टोरीला एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे, यात त्याने रोनाल्डोच्या टिकारांवरही निशाणा साधला आहे. त्याने रोनाल्डोने सामनावीराची ट्रॉफी हातात घेतलेला फोटो शेअर केला आहे.

तसेच त्यावर विराटने लिहिले आहे की 'वयाच्या 38 व्या वर्षीही तो सर्वोच्च स्तरावर अजूनही तो खेळतोय. फुटबॉल एक्सपर्ट लक्ष वेधण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी दर आठवड्याला त्याच्यावर टीका करतात. ते आता सोयीस्करपणे शांत आहेत, कारण त्याने जगातील सर्वोत्तम क्लबपैकी एका क्लबविरुद्ध शानदार कामगिरी केली. आणि तो सपंला आहे असं लोक म्हणत होते.' विराटची ही पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

(Virat Kohli post for Cristiano Ronaldo)

दरम्यान, गुरुवारी झालेल्या सामन्यात चाहत्यांना रोनाल्डो विरुद्ध मेस्सी अशी लढतही पाहायला मिळाली. मेस्सीनेही या सामन्यात एक गोल केला.

तसेच अल नासरबरोबर करार केल्यानंतर रोनाल्डोचा हा सौदी अरेबियामधील पहिलाच सामना होता. आता तो रविवारी अल नासरकडून पदार्पण करणार आहे. रविवारी अल नासरचा सामना अल इत्तिफाक विरुद्ध होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com