विराट कोहली कोणाला म्हणाला.."आय बापू थारी बॉलिंग कमाल छे"

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

विराट कोहलीनेही अक्षर पटेलचा चक्क त्याच्या मातृभाषेत, म्हणजेच गुजराती भाषेत शुभेच्छा दिल्या आहेत. पंजाबी मुंडा असेलला विराट कोहलीचं गुजराती ऐकून हार्दिक व अक्षरदेखील अवाक् झाले. 

अहमदाबाद : अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवल्या  गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय स्टार फिरकी गोलंदाज अक्षर  पटेल 'सामनावीर' ठरला. अवघ्या दोन दिवसांत संपलेल्या या डे नाईट टेस्टमध्ये अक्षर पटेलने 70 धावांत 11 बळी घेतले. अक्षरच्या या यशाबद्दल क्रिकेट विश्वातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याच्या गोलंदाजीवर खुश होत, विराट कोहलीनेही अक्षर पटेलचा चक्क त्याच्या मातृभाषेत, म्हणजेच गुजराती भाषेत शुभेच्छा दिल्या आहेत. पंजाबी मुंडा असेलला विराट कोहलीचं गुजराती ऐकून हार्दिक व अक्षरदेखील अवाक् झाले. मोटेरा येथे भारतीय संघाने शानदार खेळी केली. दाखविली. रविचंद्रन अश्विनसह अक्षर पटेलने दोन्ही डावांमध्ये इंग्लिश फलंदाजांना धावा काढू दिल्या नाही.

INDVsENG : इंग्लंड दोनच दिवसात हरल्यामुळे केविन पीटरसन भडकला; म्हणाला..

पहिल्या डावात इंग्लंडला केवळ 112 धावांवर बाद केल्यानंतर भारतीय फलंदाजही काही खास चमक दाखवू शकले नाहीत. टीम इंडियाचा  पहिला डाव 145 धावांवर बाद झाला होता. इंग्लंडच्या फिरकी जोडी जॅक लीच आणि जो रूटने विकेट्स घेतल्या, पण जेव्हा फलंदाजीची वेळ आली तेव्हा इंग्लिश फलंदाजी पुन्हा एकदा ढेपाळली. पहिल्या डावात सहा बळी घेणारा अक्षर पटेल दुस्या डावातही हिरो ठरला. दुसऱ्या डावातही त्याने शानदार गोलंदाजी केली आणि 5 बळी घेतले. सामना जिंकल्यानंतर हार्दिक पांड्या अक्षर पटेलची मुलाखत घेत असताना, विराट कोहलीने मधेच येत "आय बापू थारी बॉलिंग कमाल छे", असे गुजराती भाषेतून बोलत अक्षरला शुभेच्छा दिल्या.

INDvsENG बॉलिवुडचे शेहनशहा म्हणाले, "इंग्लैंड को धोबी पछाड़"

विराटच्या या कृतीमुळे हार्दिक व अक्षर दोघेही आपला हशा थांबवू शकले नाही. भारतीय टीमच्या या तिन्ही खेळाडूंचा हा गमतीदार व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अक्षर पटेलच्या नावाने आता त्याच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात पाच विकेट घेण्याचा अनोखा विक्रम साकारला आहे. सामन्यानंतरच्या सादरीकरणात विराट कोहलीने या 27 वर्षीय खेळाडूची प्रशंसा केली. गुजरातचा डावखुरा फिरकी गोलंदाज याची गुणवत्ता पाहून तोही आश्चर्यचकित असल्याचेही भारतीय कर्णधार म्हणाला.

संबंधित बातम्या