India vs Sri Lanka: किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! शतकी खेळीसह मास्टर-ब्लास्टरच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत शतकी खेळी केली आहे.
Virat Kohli 73rd Century
Virat Kohli 73rd CenturyDainik Gomantak

Virat Kohli: भारत विरुद्ध श्रीलंका संघात गुवाहाटी येथे वनडे मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे. बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात भारताचा मधल्या फळीतील फलंदाज विराट कोहलीने शतकाला गवसणी घातली आहे.

त्याने 80 चेंडूत शतक पूर्ण केले. विराटने ही शतकी खेळी करताना 10 चौकार आणि 1 षटकार मारला. हे विराटचे वनडे क्रिकेटमधील 45 वे शतक आहे. तसेच त्याचे एकूण 73 वे आंतरराष्ट्रीय शतक ठरले. इतकेच नाही तर या शतकासह त्याने मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या एका विक्रमाशी बरोबरी केली आहे.

Virat Kohli 73rd Century
India vs Sri Lanka: नव्या वर्षात हिटमॅनचा जुना अंदाज! अर्धशतकासह मोठ्या विक्रमाला घातली गवसणी

विराटची सचिनशी बरोबरी

विराटचे हे मायदेशातील 20 वे वनडे शतक ठरले आहे. त्यामुळे तो वनडे क्रिकेटमध्ये मायदेशात खेळताना सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर असणाऱ्या सचिनशी बरोबरी केली आहे. सचिननेही वनडे क्रिकेटमध्ये मायदेशात 20 शतके केली आहेत.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेत खेळताना 14 वनडे शतके केली आहेत. तसेच या यादीत 13 शतकांसह ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग तिसऱ्या आणि 12 शतकांसह न्यूझीलंडचा रॉस टेलर चौथ्या क्रमांकावर आहे.

विराटने 12500 धावांचाही टप्पा पार

विराटने ही शतकी खेळी करताना वनडे क्रिकेटमध्ये 12500 धावा पूर्ण करण्याचा टप्पाही पार केला आहे. वनडेत हा टप्पा पार करणारा तो सचिननंतरचा (18426) दुसराच भारतीय खेळाडू आहे, तर जगातील सहावा खेळाडू आहे.

यापूर्वी सचिन आणि विराट व्यतिरिक्त कुमार संगकारा (14234), रिकी पाँटिंग (13704), सनथ जयसूर्या (13430) आणि माहेला जयवर्धने (12650) यांनी वनडेत 12500धावांचा टप्पा पार केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com