Virat Kohli: ‘खाओ, पियो, ऐश करो मित्रों’, विराट कोहलीने शेयर केला बालपणाचा फोटो

Virat Kohli: ‘खाओ, पियो, ऐश करो मित्रों’, विराट कोहलीने शेयर केला बालपणाचा फोटो

भारतीय फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. रोज विराट फोटो किंवा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असतो. कोहलीने आशिया कपमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध T20 मधील पहिले शतक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील 71 वे शतक झळकावले. त्याचवेळी कोहलीने त्याच्या लहानपणीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो खूप व्हायरल होत आहे.

Virat Kohli: ‘खाओ, पियो, ऐश करो मित्रों’, विराट कोहलीने शेयर केला बालपणाचा फोटो
Vasco: बाप्पा चालले आपल्या गावाला

विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्रामवर लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. 'खाओ, पीओ ऐश करो मित्रांनो.. दिल पर किससे दा दुखाओ ना ला है' असे या फोटोवर विराटने लिहिले आहे. खरंतर, त्याच्या या फोटोमध्ये विराट एका पार्टीत जेवणाच्या ताटातून काहीतरी खाताना दिसत आहे. विराटचा हा फोटो वेगाने व्हायरल होत आहे. विराटच्या चाहत्यांना त्याचा हा बालपणीचा फोटो खूपच आवडला असल्याचे दिसत आहे.

विराट कोहलीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 71 वे शतक अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात झळकावले. कोहलीच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, त्याने आतापर्यंत 104 T20 सामने खेळले आहेत. यादरम्यान विराट कोहलीने 51.94 च्या सरासरीने 3584 धावा आणि 138.38 च्या इकॉनॉमीने धावा केल्या आहेत.

Virat Kohli: ‘खाओ, पियो, ऐश करो मित्रों’, विराट कोहलीने शेयर केला बालपणाचा फोटो
Sharad Pawar NCP: 'राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारच', अध्यक्षपदी फेरनिवड

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com