Asia Cup 2022: विराट कोहलीचे अखेर शतक, 1020 दिवस पाहिली वाट

Virat Kohli: टीम इंडियाचा महान फलंदाज विराट कोहलीने अखेर शतक झळकावले.
Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak

Asia Cup 2022: टीम इंडियाचा महान फलंदाज विराट कोहलीने अखेर शतक झळकावले. आपल्या 70 व्या ते 71 व्या आंतरराष्ट्रीय शतकासाठी त्याने 1020 दिवस वाट पाहिली. ही प्रतीक्षा अखेर संपली. 8 सप्टेंबर 2022 रोजी त्याने शतक झळकावले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे पहिले शतक असले तरी, विराटच्या बॅटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हे 71वे शतक झळकावले आहे.

दरम्यान, विराटने शेवटचे शतक 23 नोव्हेंबर 2019 रोजी ठोकले होते. बांगलादेशविरुद्ध पिंक बॉल कसोटी सामन्यात शतक झळकावण्यात तो यशस्वी झाला होता. त्याचबरोबर, विराटने आशिया कप 2022 च्या सुपर 4 सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध (Afghanistan) 11 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 53 चेंडूत शतक पूर्ण केले. यादरम्यान त्याचा स्ट्राइकरेट 188.68 होता.

Virat Kohli
Asia Cup 2022 मधून टीम इंडिया जवळपास बाहेर, ट्विटरवर #SackRohit झाला ट्रेंड

दुसरीकडे, अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा विराट कोहली हा पहिला खेळाडू आहे. त्याच्या आधी, अफगाणिस्तानविरुद्ध T20 क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या ल्यूक राइटची होती, ज्याने नाबाद 99 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर आता विराट कोहलीने (Virat Kohli) 61 चेंडूत 122 धावांची खेळी केली आहे. याशिवाय, तो T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (T20 International Cricket) भारतासाठी (India) सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com