सोशल मिडीयावर कोहलीने गाठला 'विराट' टप्पा

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने ट्विटरवर 50 दशलक्ष फॉलोवर्सचा टप्पा गाठणारा आहे.
virat kohli
virat kohli Dainik Gomantak

आशिया चषकात आपल्या जुन्या अंदाजात फलंदाजी करत पुन्हा फॉर्ममध्ये पतरणाऱ्या भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची (Virat Kohli) सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान, ट्विटरवर 50 दशलक्ष फॉलोवर्सचा टप्पा गाठला आहे. याबाबत विराट कोहली पहिला क्रिकेटपटू ठरला असून चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोशल मीडियावरील आखडे याचा ताजा पुरावा आहे.

जवळपास तीन वर्षांपासून खराब फॉर्मचा सामना करणाऱ्या विराटने त्याची जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये गणना का केली जाते? हे आशिया चषकात दाखवून दिले आहे. कोहलीने या स्पर्धेदरम्यान नोव्हेंबर 2019 पासूनचा शतकाचा दुष्काळही संपवला आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या सुपर 4 फेरीतील शेवटच्या सामन्यात त्याने 61 चेंडूत नाबाद 122 धावांची खेळी केली. क्रिकेटच्या मैदानावर अफाट कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीचा सोशल मीडियावरही दबदबा पाहायला मिळतोय. ट्विटरवर 50 दशलक्ष फॉलोवर्स असलेला तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरलाय. ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केलेल्या क्रिकेटपटूंच्या यादीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. तर, भारताचा माजी स्टार क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिनच्या ट्विटरवर फॉलोअर्सची संख्या 37.8 दशलक्ष इतकी आहे.

विराटच्या फॉलोवर्समध्ये वाढ

जगातील सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक असलेल्या विराट कोहलीचे इंस्टाग्रामवर 211 मिलियन फॉलोअर्स आहेत. फेसबूकवर त्याचे 49 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तर, ट्विटरच्या फॉलोवर्सची संख्या 50 दक्षलक्ष झाली आहे. ज्यामुळे विराटचे सोशल मीडियावर 310 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

virat kohli
वेदा कृष्णमूर्तिला केलं कर्नाटकच्या क्रिकेटपटूनं प्रपोज! पाहा फोटो

विराटने भारतासाठी आतापर्यंत 102 कसोटी, 262 एकदिवसीय आणि 104 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 8 हजार 74 धावांची नोंद आहे. ज्यात 27 शतक आणि 28 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं 12 हजार 344 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं 43 शतक आणि 64 अर्धशतक झळकावली आहेत. याशिवाय, त्यानं टी-20 क्रिकेटमध्ये एक शतक आणि 32 अर्धशतकांच्या मदतीनं 3 हजार 584 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com