Virat Kohli चे बल्ले-बल्ले, टी-20 क्रमवारीत घेतली गगनभरारी

Team India: श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वनिंदू हसरंगा यांना आशिया चषक 2022 मधील उत्कृष्ट कामगिरीचा फायदा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत झाला आहे.
Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak

Team India Star Batsman Virat Kohli: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वनिंदू हसरंगा यांना आशिया चषक 2022 मधील उत्कृष्ट कामगिरीचा फायदा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत झाला आहे. विराटने गेल्या तीन वर्षांतील पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले आहे. तर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील त्याचे हे पहिले शतक आहे. या शतकाच्या जोरावर T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या क्रमवारीत विराटने 14 स्थानांनी झेप घेतली असून तो 15 व्या स्थानावर पोहोचला आहे. तर दुसरीकडे, प्लेअर ऑफ द टूर्नामेंट वनिंदू हसरंगाने टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

दरम्यान, टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) चौथ्या स्थानावर आहे, तर कर्णधार रोहित शर्मा 14 व्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान टी-20 क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे, तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर गोलंदाजी क्रमवारीबद्दल बोलायचे झाल्यास, भुवनेश्वर कुमार सातव्या स्थानावर घसरला आहे.

Virat Kohli
Virat Kohli: ‘खाओ, पियो, ऐश करो मित्रों’, विराट कोहलीने शेयर केला बालपणाचा फोटो

दुसरीकडे, जोश हेझलवूड टी-20 गोलंदाजीमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर शाकिब अल हसन टी-20 अष्टपैलूंच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) सातव्या स्थानावर घसरण झाली आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबी अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com