विराट कोहलीने अनुष्का आणि वामिकाला खास अंदाजात दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा

विराट कोहलीने अनुष्का आणि वामिकाला खास अंदाजात दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा
Virat Kohli wished Anushka and daughter Vamika a special Womens Day

मुंबई : आज आंतरराष्ट्रीय महिला दिन जगभर साजरा केला जात आहे. या निमित्ताने सर्व सेलेब्स खास पोस्ट्स शेअर करत आहेत. अभिनेत्री अनुष्का शर्माचा तिच्या मुलीसह एक खास फोटो समोर आला आहे. विराट कोहलीने हा फोटो शेअर करत अनुष्का व त्यांची मुलगी वामिकाला महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 11 जानेवारीला अनुष्का शर्मा व विराट कोहली आई-बाबा झाले. 1 फेब्रुवारी रोजी मुलीच्या जन्मानंतर अनुष्काने सोशल मीडियावर मुलीचा पहिला फोटो शेअर केला होता. 

विराटने अनुष्काला दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा
अनुष्काला महिला दिनाच्या शुभेच्छा देताना विराट कोहलीने एक खास फोटो शेअर केला आहे. दोघांचा फोटो शेअर करत विराटने खास कॅप्शनही लिहिले आहे. विराट कोहलीने आपल्या पोस्टवर असे म्हटले आहे की, “एखाद्या मुलाचा जन्म होताना पाहणे हा माणसाला मिळणारा सर्वात शीतल, अविश्वसनीय आणि आश्चर्यकारक अनुभव आहे. यानंतर तुम्हाला महिलांचे खरे सामर्थ्य आणि देवत्व समजते आणि देवाने त्यांच्या शरीरात नवीन जीवन का निर्माण केले. कारण त्या पुरुषांपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेत. माझ्या आयुष्यातील सर्वात कणखर स्त्रीला आणि भविष्यात तिच्या आईसारखंच व्यक्तीमत्व आत्मसात करणारीला (वामिका) महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तसंच, जगातील सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

अनुष्का शर्माने गेल्या महिन्यात वामिकाचा पहिला फोटो शेअर केला होता. कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, "आम्ही आमची जीवनशैली प्रेम, आणि कृतज्ञतेसह एकत्र जगलो आहोत पण या लहान बाळाने, वामिकाने हे पूर्णपणे नवीन स्तरावर नेले आहे! अश्रू, हशा, चिंता, आनंद - भावना ज्यात आहेत कधीकधी काही मिनिटांच्या कालावधीत अनुभवले गेले आहे! तुमच्या सर्व शुभेच्छा, प्रार्थना आणि चांगल्या उर्जेबद्दल धन्यवाद."

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com