एबी डिव्हिलियर्सच्या निवृत्तीनंतर विराट कोहलीचे 'I Love You' वाले ट्वीट होतयं व्हायरल !
AB Devilliers & Virat KohliDainik Gomantak

एबी डिव्हिलियर्सच्या निवृत्तीनंतर विराट कोहलीचे 'I Love You' वाले ट्वीट होतयं व्हायरल !

डिव्हिलियर्सने (AB Devilliers) आज निवृत्तीची घोषणा केली तेव्हा कोहलीला आपल्या भावना आवरता आल्या नाहीत.

दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) महान फलंदाजांपैकी एक असलेल्या एबी डिव्हिलियर्सने (AB Devilliers) शुक्रवारी सर्व क्रिकेटप्रेमींना चकित केले. क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. डिव्हिलियर्सने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडले होते, परंतु तो फ्रँचायझी क्रिकेट खेळत होता. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून (Royal Challengers Bangalore) खेळायचा. दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून (Delhi Daredevils) सुरुवात केल्यानंतर डिव्हिलियर्स चौथ्या सत्रानंतर आरसीबीमध्ये आला. तेव्हापासून विराट कोहली आणि त्यांची मैत्रीचं पर्व सुरु झालं. त्यांच्या या मैत्रीचे उदाहरण क्रिकेटविश्वात अनेकदा दिले जात. त्याचे प्रत्यंतर आज पुन्हा पाहायला मिळाले. डिव्हिलियर्सने आज निवृत्तीची घोषणा केली तेव्हा कोहलीला आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. त्याने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या खास मित्राला भावनिक संदेश पाठवला.

दरम्यान, कोहलीने ट्विट करुन म्हटले की, माझे मन दुःखी आहे. परंतु डिव्हिलियर्सने स्वत:साठी आणि कुटुंबासाठी योग्य निर्णय घेतला आहे. त्याने पुढे लिहीले " माझे मन खूप दुखावले आहे, परंतु मला माहित आहे की तू नेहमीप्रमाणेच स्वतःसाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी योग्य निर्णय घेतला आहेस. मी तुझ्यावर प्रेम करतो." आपल्या मित्राचा हा मेसेज पाहून डिव्हिलियर्सनेही उत्तर दिले आणि लिहिले की, मी माझ्या भावावर खूप प्रेम करतो.

AB Devilliers & Virat Kohli
'मैं आधा भारतीय और आधा साउथ अफ्रीकी'... म्हणत डिव्हिलियर्सने निवृत्तीची केली घोषणा

आमच्या काळातील महान फलंदाज

आणखी एका ट्विटमध्ये कोहलीने डिव्हिलियर्सचे त्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून वर्णन केले आहे. त्याने लिहिले, "आमच्या काळातील सर्वोत्तम फलंदाज. मला भेटलेल्या खेळाडूंपैकी सर्वात प्रेरणादायी व्यक्ती आहे. तु जे काही केले आणि आरसीबीला जे काही दिले याचा आम्हाला अभिमान वाटतो. आमची मैत्री या खेळाच्या पुढे असून आम्ही नेहमीच ती जपू.

अनेक सामने जिंकले, फक्त विजेतेपद मिळाले नाही

या दोघांची गणना सध्याच्या काळातील महान फलंदाजांमध्ये केली जाते. या दोघांच्या जोडीने आरसीबीसाठी अनेक सामने जिंकले. परंतु ही जोडी एकही आयपीएल जिंकू शकली नाही, याची खंत या दोघांनाही नक्कीच असेल. या दोघांच्या फलंदाजीचा धसका जगातील अनेक महान अशा गोलंदाजांनी घेतला होता. या दोघांच्या नावावर आयपीएलमधील सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रम आहे. कोहली आणि डिव्हिलियर्स यांनी 14 मे 2016 रोजी बेंगळुरु येथे गुजरात लायन्सविरुद्ध 229 धावांची भागीदारी केली होती. आयपीएलच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी आहे. कोहलीने या सामन्यात 55 चेंडूत पाच चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने नाबाद 109 धावा केल्या. त्याच वेळी, डिव्हिलियर्सने नाबाद 129 धावांची खेळी केली ज्यामध्ये त्याने 52 चेंडूंचा सामना केला आणि 10 चौकार आणि 12 षटकार ठोकले.

या जोडीने यापूर्वी 2015 मध्येही द्विशतकी भागीदारी केली होती. 10 मे 2015 रोजी झालेल्या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 1 गडी गमावून 235 धावा केल्या होत्या. या सामन्यात दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 215 धावांची भागीदारी केली होती. विराट कोहलीच्या बॅटमधून 82 धावा झाल्या. इतक्या धावा करण्यासाठी कोहलीने 50 चेंडूंचा सामना केला आणि सहा चौकारांसह चार षटकार ठोकले. पण खरा गदारोळ डिव्हिलियर्सने केला. त्याने 59 चेंडूंत 19 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद 133 धावांची खेळी केली. आयपीएलमधील डिव्हिलियर्सची ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com