Rohit Sharmaचे उपकर्णधारपद विराटला काढून घ्यायचे होते

उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा एक 'नेता' मानला जातो जो तरुण खेळाडूंना सोबत घेण्यास शिकला आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) मुंबई इंडियन्ससोबत वर्षानुवर्ष तो हे काम करत आहे.
रोहित शर्माला (Rohit Sharma) टीम इंडियाच्या (Team India) उपकर्णधारपदावरून (Vice-captain) विराट कोहलीला (Virat Kohli) हटवायचे होते.
रोहित शर्माला (Rohit Sharma) टीम इंडियाच्या (Team India) उपकर्णधारपदावरून (Vice-captain) विराट कोहलीला (Virat Kohli) हटवायचे होते. Dainik Gomantak

रोहित शर्माला (Rohit Sharma) टीम इंडियाच्या (Team India) उपकर्णधारपदावरून (Vice-captain) विराट कोहलीला (Virat Kohli) हटवायचे होते. तेव्हापासूनच असे अनुमान लावले जात आहे. रोहित शर्माच भारतीय संघाचा नवा कर्णधार असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित 34 वर्षांचा असल्याने रोहितला वनडे उपकर्णधारपदातून वगळण्याचा प्रस्ताव घेऊन कोहली निवड समितीकडे गेला होता. वनडे उपकर्णधारपद केएल राहुलकडे (KL Rahul) सोपवावे अशी त्याची इच्छा होती. त्याचबरोबर टी-20 मध्ये रिषभ पंतला (Rishabh Pant) संघाचा उपकर्णधार बनवले पाहिजे असेही त्याने सांगितल्याचे समोर येत आहे.

रोहित शर्माला (Rohit Sharma) टीम इंडियाच्या (Team India) उपकर्णधारपदावरून (Vice-captain) विराट कोहलीला (Virat Kohli) हटवायचे होते.
कर्णधारपदावरुन अखेर विराट पायउतार

बोर्डाच्या एका सूत्राने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, "बोर्डला कोहलीचा प्रस्ताव आवडला नाही. बोर्डाच्या मते, विराटला खरोखर कोणताही उत्तराधिकारी नको आहे." बीसीसीआयने नजीकच्या भविष्यात कोहलीकडून 50 षटकांच्या फॉरमॅटचे कर्णधार पद काढून घेतल्यास आश्चर्य वाटायला नको. टी -20 विश्वचषकात ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरल्यानंतर, कोहलीला 50 षटकांच्या फॉर्मेटमध्ये फलंदाज म्हणूनही पायउतार व्हावे लागू शकते. ड्रेसिंग रूममध्येही उपकर्णधार रोहित शर्मा हा एक 'नेता' मानला जातो जो तरुण खेळाडूंना सोबत घेण्यास शिकला आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्ससोबत वर्षानुवर्ष तो हे काम करत आहे.

कोहलीला गेल्या काही काळापासून ड्रेसिंग रुममध्ये पूर्ण पाठिंबा नव्हता. त्याच्या जवळून पाहणाऱ्यांचा असा विश्वास आहे की त्याच्या कार्यशैलीमध्ये कोणतीही लवचिकता नाही. साऊथॅम्प्टन येथे दोन स्पिनर्ससह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये जाणे किंवा 2019 च्या वर्ल्डकपपूर्वी खेळाडूला चौथे स्थान मिळवू न देणे. विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यास रोहित शर्माला टी -20 संघाचा कर्णधार बनवण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com