Virender Sehwag Birthday: वीरुची 'मुलतानचा सुलतान' बनण्याची कहाणी तुम्हाला माहितीये का?

HBD Virender Sehwag: भारताचा हा माजी सलामीवीर आज म्हणजेच 20 ऑक्टोबर 2022 रोजी 44 वर्षांचा झाला आहे.
Virender Sehwag
Virender Sehwag Dainik Gomantak

Virender Sehwag Birthday: जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या वीरेंद्र सेहवागचे नाव आले की प्रत्येकाला त्याची झंझावाती फलंदाजी आठवू लागते. भारताचा हा माजी सलामीवीर आज म्हणजेच 20 ऑक्टोबर 2022 रोजी 44 वर्षांचा झाला आहे. चाहते त्याचे वेगवेगळ्या प्रकारे अभिनंदन करत आहेत. दिल्लीच्या नजफगढमध्ये जन्मलेल्या सेहवागने अनेक विक्रम आणि संस्मरणीय खेळी खेळल्या, पण पाकिस्तानविरुद्ध त्यांच्याच भूमीवर त्याने केलेले त्रिशतक नेहमीच खास राहीले आहे.

स्फोटक फलंदाजांपैकी एक

सेहवाग आता क्रिकेटच्या खेळपट्टीवर दिसत नसला तरी तो ना चाहत्यांपासून दूर आहे ना क्रिकेटपासून. सोशल मीडियापासून ते कॉमेंट्री बॉक्सपर्यंत तो अनेकदा चर्चेत भाग घेतो. भारतातीलच नव्हे तर जगातील स्फोटक फलंदाजांमध्ये त्याची गणना होते. पाकिस्तानचा शोएब अख्तर (Shoaib Akhtar) असो की ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा... असा एकही गोलंदाज नाही की ज्याची सेहवागने धुलाई केली नसेल. त्याला मुलतानचा सुलतान असेही म्हणतात. याचे कारण म्हणजे त्याने पाकिस्तानविरुद्धच्या (Pakistan) कसोटी सामन्यात खेळलेली त्याची खास खेळी.

Virender Sehwag
बल्ले बल्ले! वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग आणि पठाण ब्रदर्स पुन्हा एकदा मैदानावर झळकणार

अशा प्रकारे मुलतानचा सुलतान झाला

सेहवागला नजफगढचा प्रिन्स किंवा नवाब असेही म्हणतात. त्याच्या वाढदिवशी जाणून घ्या, त्याला 'मुलतानचा सुलतान' बनवणाऱ्या कथेबद्दल. वर्ष होते 2004, भारतीय संघ सद्भावना मालिकेसाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर होता. मालिकेतील पहिला कसोटी सामना मुलतानच्या भूमीवर 28 मार्चपासून सुरु झाला.

तत्कालीन कर्णधार राहुल द्रविडने (Rahul Dravid) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सेहवाग आणि आकाश चोप्रा सलामीसाठी मैदानात उतरले होते. सेहवागने पाकिस्तानच्या प्रत्येक गोलंदाजाची पळतभुई थोडी केली. भारताची पहिली विकेट 160 धावांवर पडली, मात्र त्यात आकाशचे योगदान केवळ 42 धावांचे होते. कर्णधार द्रविड 6 धावा करुन बाद झाला. त्यावेळी भारताची धावसंख्या 2 बाद 173 अशी होती.

Virender Sehwag
वीरेंद्र सेहवाग हार्दिक पंड्याला मानतो उत्कृष्ट कर्णधार; म्हणाला..

त्रिशतक ठोकणारा पहिला भारतीय

सेहवागची धडाकेबाज शैली पाहता त्याने दुस-या दिवशी उपाहारापूर्वी आपले त्रिशतक पूर्ण केले होते. वीरुने 309 धावांची खेळी खेळली. भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला. एवढेच नाही तर पाकिस्तानी भूमीवर त्रिशतक झळकावणारा तो पहिला भारतीय ठरला. त्याचवेळी पाकिस्तानमधील सर्वात मोठी धावसंख्याही या भारतीयाच्या नावावर नोंदवली गेली.

सचिनसोबत 336 धावा केल्या

सेहवाग आणि सचिन तेंडुलकरने तिसऱ्या विकेटसाठी 336 धावांची भागीदारी केली. सेहवाग 509 धावांवर तिसरी विकेट म्हणून बाद झाला. त्याला मोहम्मद सामीने तौफीक उमरच्या हाती झेलबाद केले. यादरम्यान सेहवागने 375 चेंडूंचा सामना करत 39 चौकार, 6 षटकार मारले.

Virender Sehwag
IPL 2021: शुभमन गिलकडे आहे दिग्गजांसारखा खेळ करण्याची क्षमता; वीरेंद्र सेहवाग

सचिनचे द्विशतक हुकले, द्रविडने परत बोलावले

कर्णधार राहुल द्रविडने पहिला डाव घोषित केला तेव्हा सचिन 194 धावांवर फलंदाजी करत होता. त्यानंतर चाहत्यांनीही याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. आजही काही लोकांचा असा विश्वास आहे की, सचिनने द्विशतक पूर्ण करावे असे द्रविडला वाटत नव्हते. भारताने पहिल्या डावात 5 बाद 675 धावा केल्या. पाकिस्तानचा पहिला डाव 407 धावांवर आटोपला आणि दुसऱ्या डावात यजमानांना 216 धावा करता आल्या. भारताने हा सामना एक डाव आणि 52 धावांनी जिंकला. इरफान पठाणने पहिल्या डावात 4 तर अनुभवी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेने दुसऱ्या डावात 6 बळी घेतले.

Virender Sehwag
'Rakesh Jhunjhunwala एका युगाचा अंत' वीरेंद्र सेहवागने झुनझुनवाला यांच्या निधनावर व्यक्त केला शोक

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17 हजारांहून अधिक धावा

सेहवागने आपल्या कारकिर्दीत 104 कसोटी, 251 एकदिवसीय आणि 19 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 49.34 च्या सरासरीने 23 शतके आणि 32 अर्धशतके झळकावली. त्याच्या नावावर कसोटीत 8586 धावा आणि 40 विकेट्स आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 15 शतके आणि 38 अर्धशतकांच्या मदतीने एकूण 8273 धावा केल्या. त्याने वनडेत 96 विकेट्सही घेतल्या. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये त्याने दोन अर्धशतकांच्या जोरावर 394 धावा केल्या. त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत एकूण 14683 धावा आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com