विरेंद्र सेहवाग म्हणतो..रिषभ पंत हाच 'अल्टिमेट स्ट्रिट क्रिकेटर'

Virender Sehwag calls Rishabh pant an ultimate street cricketer
Virender Sehwag calls Rishabh pant an ultimate street cricketer

अहमदाबाद :  रिषभ पंतने आपल्या स्फोटक फलंदाजीतील कामगिरीने आणि यष्टीच्या मागे उभं राहून केलेल्या जोक्समुळे कायमच चर्चेत असतो. त्याच्या या कौशल्यामुळे भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने त्याला 'अल्टिमेट स्ट्रिट क्रिकेटर' म्हटलं आहे. आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत सेहवाग म्हणाला," रिषभ पंत हा अल्टिमेट स्ट्रिट क्रिकेटर आहे. तो विकेटकिपिंग करताना इतका आवाज करतो, कि फलंदाज गोंधळून जातो. हे बघून फक्त आवाज केल्यामुळे आपण चांगले विकेटकिपर होऊ शकतो का, असे काहींना वाटेल."

सध्या सुरू असलेल्या भारत विरूद्ध इंग्लंड तिसऱ्या कोसटी सामन्यामुळे रिषभ पंतला कारकीर्दीत प्रथमच पिंक  बॉल टेस्ट खेळण्याची संधी मिळाली. पहिला दिवस संपल्यानंतर वीरेंद्र सेहवागने अहमदाबादच्या पहिल्या दिवसाच्या खेळाची एक क्लिपपोस्ट केली, ज्यात पंतच्या विकेट मागच्या बोलण्याने बेन फोक्स आणि जॅक लीच यांना गोंधळात टाकले. अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विनच्या शानदार खेळीमुळे टीम इंडियाने इंग्लंडच्या क्रिकेट संघाला नरेंद्र मोदी स्टेडियमवर 112 धावांवर रोखले. 

टीम इंडियाने तिसर्‍या कसोटीत आपले स्थान मजबूत केले आहे. पिंक बॉलसह मोटेरा कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडचा संघ केवळ 112 धावांवर बाद झाला. डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलने सहा गडी बाद केले. त्याने सलग दुसर्‍या डावात पाच विकेट्स घेतल्या. ऑफस्पिनर आर अश्विननेही तीन गडी बाद केले. त्याने आतापर्यंत या मालिकेत 20 विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंडच्या 112 धावांच्या उत्तरात टीम इंडियाने पहिल्या दिवशी तीन विकेट्सवर 99 धावा केल्या आहेत. 
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com