शार्दुल, प्रसिद्ध कृष्णा व भुवी बद्दल वीरूचे भन्नाट ट्विट होतंय चांगलचं व्हायरल  

दैनिक गोमन्तक
बुधवार, 24 मार्च 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. आणि या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने धमाकेदार करून सामना आपल्या खिशात घातला आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. आणि या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने धमाकेदार करून सामना आपल्या खिशात घातला आहे. त्यासोबतच भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेत पाहुण्या इंग्लंड संघावर आघाडी घेतली आहे. मंगळवारी पुण्यातील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर 66 धावांनी विजय मिळवला. मात्र या सामन्यात एका वेळेला इंग्लंडचा संघ टीम इंडियावर वरचढ ठरणार असे वाटत असतानाच गोलंदाजांनी केलेल्या कमालीचा फायदा संघाला झाल्याचे पाहायला मिळाले. व नेमका हाच धागा पकडून भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने सोशल मीडियावर खेळाडूंचे कौतुक केले आहे. (Virender Sehwag made a unique tweet about Shardul Thakur Prasidh Krishna and Bhuvi)

INDvsENG 1st ODI : टीम इंडियाचा पाहुण्या इंग्लंड संघावर दमदार विजय 

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाहुण्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे भारतीय संघाला पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागले होते. त्यानंतर टीम इंडियाने निर्धारित 50 षटकांमध्ये पाच गडी गमावत 317 धावासंख्या उभारली. यावेळी भारतीय संघाकडून शिखर धवनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 106 चेंडूंचा सामना करताना 11 चौकार आणि 2 षटकारांच्या जोरावर 98 धावा केल्या. याशिवाय विराट कोहली, केएल राहुल आणि आपला पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळत असलेल्या कृणाल पांड्याने अर्धशतकीय खेळी साकारली. यानंतर भारतीय संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड संघाची सुरवात दमदार झाल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंड संघाचे सलामीवीर जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी पहिल्या विकेटसाठी तब्बल 135 धावांची भागीदारी रचली. त्यामुळे मधेच सामना भारताच्या हातातून निसटतो की काय असे वाटत होते. पण भारतीय गोलंदाजांनी पुन्हा आपली कमाल दाखवत सामना आपल्या बाजूने वळवून घेऊन विजय मिळवला.

Ind vs Eng:  एकीकडे पांड्य़ा ब्रदर्स तर दुसरीकडे करन ब्रदर्स 

भारतीय गोलंदाजांनी केलेल्या नेमक्या याच खेळीचे कौतुक माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने केले आहे. वीरेंद्र सेहवागने सोशल मीडियावरील ट्विटरवर याबाबतचे एक मीम शेअर केले असून, ते नेटकऱ्यांमध्ये चांगलेच व्हायरल झाले आहे. यासोबतच त्याने एक भन्नाट कॅप्शन देखील या पोस्टला दिला आहे. वीरेंद्र सेहवागने पोस्ट केलेल्या मीम मध्ये, एकदम से वक्त बदल दिया, जजबात बदल दिया, जिंदगी बदल दी, असे लिहिलेले आहे. आणि या मीम सोबत त्याने इंग्लंडचा संघ 14.1 षटकात 135/0 अशा मजबूत स्थितीत असताना लॉर्ड शार्दुल (Shardul Thakur), प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) आणि भुवी (Bhuvneshwar Kumar) आल्याचे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे वीरेंद्र सेहवागने शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा आणि भुवनेश्वर कुमार यांच्याबाबत केलेले हे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे. 

दरम्यान, इंग्लंड संघाचे सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉय यांनी पहिल्या विकेटसाठी शतकीय भागीदारी रचून संघाला चांगली सुरवात करून दिली होती. मात्र ही जोडी आपला पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळत असलेल्या प्रसिद्ध कृष्णाने फोडली. त्याने जेसन रॉयला 46 धावांवर असताना बाद केले. व त्यानंतर मैदानात आलेल्या बेन स्टोक्सला देखील प्रसिद्ध कृष्णाने अवघ्या एक धावांवर माघारी धाडत इंग्लंड संघाला दुसरा धक्का दिला. त्यामुळे यानंतर इंग्लंड संघाचा डाव वेळोवेळी गडगडत राहिला. भारताकडून सर्वाधिक बळी प्रसिद्ध कृष्णाने टिपले. त्याने चार विकेट्स मिळवल्या. तर, शार्दूल ठाकूरने तीन, भुवनेश्वर कुमारने दोन आणि कृणाल पांड्याने एक विकेट मिळवली.                  

संबंधित बातम्या