लोकप्रिय गायक KK यांना क्रीडा क्षेत्रातून श्रध्दांजली, वीरू,vvs लक्ष्मणने केले ट्विट

क्रीडा क्षेत्रातील मंडळींनीही kk बद्दल दुःख व्यक्त केले.
KK singer
KK singerTwitter

मंगळवारी रात्री 31 मे रोजी प्रसिद्ध लोकप्रिय गायक आणि गीतकार के.के. चे वयाच्या 53 व्या वर्षी कोलकाता येथे निधन झाले. कोलकता शहरातील नजरल मंच परिसरात महाविद्यालयीन कार्यक्रमात परफॉर्म केल्यानंतर काही वेळातच त्यांचे निधन झाले. (KK Pass Away)

53-वर्षीय हे देशभरातील सर्व वयोगटांमध्ये लोकप्रिय होते आणि त्यांच्या मृत्यूने देशवासीयांना चकित केले. त्यांना देशभरातून लोकं श्रद्धांजली वाहत आहे. क्रीडा क्षेत्रातील मंडळींनीही kk बद्दल दुःख व्यक्त केले. वीरेंद्र सेहवागआणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी शोक व्यक्त करत ट्विट केले. अगदी आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स' यांनीही ट्विट करत दू:ख व्यक्त केले.

KK singer
संगीत रसिकांच्या हृदयावर राज्य करणारा आवाज नि:शब्द झाला

सेहवागने ट्विटरवर लिहिले, "कोलकाता येथे परफॉर्म करताना आजारी पडल्यानंतर केकेचे निधन झाल्याचे ऐकून दुःख झाले. आयुष्य किती नाजूक आहे याची आणखी एक आठवण. त्याच्या कुटुंबियांना आणि मित्रांप्रती शोक व्यक्त करतो. ओम शांती," लक्ष्मण यांनी लिहिले, "अद्भुत गायक, केके यांच्या अकाली निधनाने दु:ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांप्रती माझे मनःपूर्वक संवेदना. ओम शांती."

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शोक व्यक्त केला. "KK म्हणून प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नाथ यांच्या अकाली निधनाने दु:ख झाले आहे. त्यांच्या गाण्यांमधून सर्व वयोगटातील लोकांच्या मनाला भिडलेल्या भावनांची विस्तृत श्रेणी दिसून येते. त्यांच्या गाण्यांमधून आम्ही त्यांची नेहमी आठवण ठेवू. त्यांच्या कुटुंबियांबद्दल आणि चाहत्यांसाठी शोक व्यक्त करतो. ओम शांती," पीएम मोदींनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर लिहिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com