Virial Video: टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड बनले कन्नड टीचर

एलिसने द्रविडकडून कन्नड भाषा (Kannada language) शिकतानांचा व्हिडिओ (Video) आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरुन (Twitter) शेअर (Share) केला आहे.
Team India coach Rahul Dravid becomes Kannada teacher
Team India coach Rahul Dravid becomes Kannada teacherDainik Gomantak

भारतीय क्रिकेट टीममध्ये राहुल द्रविडने (Rahul Dravid) विकेट किपर , कर्णधार अशा अनेक जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत. द्रविड प्रशिक्षकच्या भूमिकेत देखील टीम इंडियाची (Team India) जबाबदारी सांभाळत आहे. तो आता नवीन भूमिकेत दिसणार आहे. राहुल द्रविडने भारतातील ब्रिटिश हाय कमिश्नर एलेक्स एलिस (Alex Ellis) यांना कन्नड भाषा (Kannada language) शिकवली आहे. भारतीय प्रशिक्षकानंतर तो आता कन्नड शिक्षकाच्या (Kannada teacher) भूमिकेत दिसत आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेटची मालिका सुरू आहे. तर भारतात ब्रिटिश हाय कमिश्नर 'बेस्ट इंडियन क्रिकेट एक्सप्रेकशन' (Best Indian Cricket Expression) च्या शोधात फिरत आहे. नुकतेच ते बंगळुरूमध्ये पोहोचले असता द्रविड त्यांना कन्नड भाषेत एक वाक्य शिकवले.

Team India coach Rahul Dravid becomes Kannada teacher
ऑलिम्पिक विजेत्यांचा BCCI करणार सन्मान, कोट्यवधींचा वर्षाव

एलिसने द्रविडकडून कन्नड भाषा शिकतानांचा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, भारतीय भाषेत 'क्रिकेट एक्सप्रेकशन पार्ट 2' आज आम्ही बंगळुरूमध्ये आहोत. येथे 'भारतीय टीमचे प्रशिक्षक' राहुल द्रविड एक उत्तम शिक्षक आहे. त्यांनी मला कन्नड भाषेमधील एक शब्द शिकवला आहे. राहुल द्रविडने कन्नड भाषेतील 'बेगा ओडी' हा शब्द शिकवला आहे.

Team India coach Rahul Dravid becomes Kannada teacher
Tokyo Olympics: भारताची सप्तपदी!

* श्रीलंका दौऱ्या दरम्यान राहुल द्रविड होते प्रशिक्षक

राहुल द्रविड अलीकडेच शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला प्रशिक्षण दिल्यानंतर श्रीलंकेमधून परतले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली देखरेखीमध्ये इंडियन टीमने श्रीलंकेला वनडे मॅचमध्ये 2-1 ने पराभव केला. परंतु कृणाल पंड्या कोरोना पॉजिटिव्ह आल्याने भारताचे मुख्य खेळाडू टी-20 मालिकेतील शेवटचे दोन सामने खेळू शकले नाहीत. याच कारणामुळे इंडियन टीमला पराभवाला सामोरे जावे लागले. इंडियन टीममधील चांगली गोष्ट म्हणजे शेवटच्या दोन टी-20 मध्ये 5 खेळाडूंना त्यांच्या बाजूने पदार्पण करण्याची संधी मिळाली. परंतु फलंदाजीमध्ये अनुभवाची कामरतात असल्याने किकल टीमच्या बाजूने गेला नाही. या सिरिजमधील पहिलं सामना भारताने जिंकला. मात्र शेवटचे दोन सामन्यांमध्ये भारतीय टीमला पराभव स्वीकारावा लागला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com