विष्णू सोळंकीच्या शतकाच्या बळावर पाच विकेट राखून विजय

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या एलिट अ गटात विष्णू सोळंकीच्या पहिल्या शतकाच्या बळावर त्यांनी पाच विकेट राखून विजय मिळविला.

पणजी : बडोद्याची भक्कम फलंदाजी शनिवारी गोव्यास भारी ठरली. विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या एलिट अ गटात विष्णू सोळंकीच्या पहिल्या शतकाच्या बळावर त्यांनी पाच विकेट राखून विजय मिळविला.

सामना गुजरातमधील सूरत येथील खोलवाड जिमखाना मैदानावर झाला. 28 वर्षीय विष्णूचे हे लिस्ट ए क्रिकेटमधील पहिलेच शतक ठरले. विष्णूने 132 चेंडूंत 12 चौकार व एका षटकाराच्या मदतीने 108 धावा केल्या. त्याने स्मित पटेल (58) याच्यासमवेत दुसऱ्या विकेटसाठी 95, तर कर्णधार कृणाल पंड्या (71) याच्या साथीत तिसऱ्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी करून बडोद्याचा विजय साकारला.

ISL 2020-21: प्ले-ऑफसाठी एफसी गोवा आणि बंगळूरसाठी महत्त्वाचा सामना

गोव्याने प्रथम फलंदाजी करताना स्नेहल कवठणकरच्या (81) अर्धशतकामुळे सर्वबाद 263 धावा केल्या होत्या. स्नेहलने एकनाथ केरकर याच्यासमवेत चौथ्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी केली.डावातील नऊ चेंडू बाकी राखून सामना जिंकताना बडोद्याने 5 बाद 264 धावा केल्या. 

संबंधित बातम्या