गोव्यातील बॅडमिंटनसाठी व्हीजन २०२० ते २४

किशोर पेटकर
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

राज्य संघटना रविवारच्या आमसभेत सादर करणार खेळासाठी कृती योजना

पणजी

गोवा बॅडमिंटन संघटनेने (जीबीए) अध्यक्ष नरहर ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मागील चार वर्षांत दिमाखदार कामगिरी बजावलीतोच मुद्दा पकडून रविवारच्या (ता. १५) आमसभेत व्हीजन २०२०-२४’ अंतर्गत प्रभावशाली कृती योजना सादर केली जाईल.

जीबीएची आगामी चार वर्षांसाठी नवी व्यवस्थापकीय समिती बिनविरोध ठरली आहे. ठाकूर यांच्या अध्यक्षपदीतसेच सचिवपदी संदीप हेबळेखजिनदारपदी सर्फराज शेखतसेच अन्य समितीच्या निवडीवर खांडेपार येथे होणाऱ्या आमसभेत शिक्कामोर्तब होईल. चार सदस्य वगळताइतर सर्वांची व्यवस्थापकीय समितीत फेरनियुक्ती असेल.

आमसभेत संघटनेचे पुढील चार वर्षांसाठी धोरण ठरविले जाईल. यासाठी संघटनेने संलग्न संस्थाखेळाडू आणि संबंधितांकडून सूचना मागविल्या आहेत. शनिवारी (ता. १५) दुपारी एक वाजेपर्यंत gbagoaonline@gmail.com या ई-मेलवर येणाऱ्या सूचना विचाराधीन असतीलअसे हेबळे यांनी नमूद केले.

जीबीएची व्यवस्थापकीय समितीसाठी आलेल्या सर्व अर्जांची छाननी निवडणूक अधिकारी मनोज पाटील यांनी केली. सर्व अर्ज ग्राह्य असल्याचे त्यांनी जाहीर केले. रविवारच्या आमसभेस गोवा ऑलिंपिक असोसिएशनतर्फे वेटलिफ्टिंग असोसिएशन ऑफ गोवाचे सचिव जयेश नाईकतर गोवा क्रीडा प्राधिकरणातर्फे महेश रिवणकर निरीक्षक या नात्याने उपस्थित राहतील.

 गोव्याची बॅडमिंटनमध्ये प्रगती ः ठाकूर

गोव्याने बॅडमिंटन खेळात चमकदार प्रगती साधली आहेअसे अध्यक्षपदी फेरनियुक्तीस सज्ज झालेले नरहर ठाकूर यांनी सांगितले. ‘‘मागील चार वर्षांत राज्यात राष्ट्रीय पातळीवरील सात स्पर्धा झाल्यायाशिवाय राज्यजिल्हातालुका पातळीवरील वेळपत्रकही जोमाने कार्यरत राहिले. त्यामुळेच आमच्या गटाने काम पुढे कायम राखावे असे सदस्यांचे एकमत बनले. आता आमच्या गटात चार नवे चेहरे आले आहेत ही चांगली बाब आहेत्यांच्यामुळे आम्हाला बॅडमिंटनच्या प्रगतीसाठी नवी ऊर्जा आणि उत्साह प्राप्त होईल,’’ असे ठाकूर म्हणाले. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या टॉप्स’ या ऑलिंपिक पदक योजनेसाठी निवड झाल्याबद्दल गोमंतकीय युवा बॅडमिंटनपटू तनिशा क्रास्टो हिचे ठाकूर यांनी अभिनंदन केले. तनिशामुळे राज्यातील युवा मुलींना प्रेरणा लाभेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. गुणवत्ताखडतर मेहनत आणि समर्पित वृत्तीने तनिशाने मोठी उंची गाठल्याचे त्यांनी नमूद केले.

 प्रशिक्षण शिबिरावर भर

जीबीएचे सचिव संदीप हेबळे यांनी सांगितलेकी ‘‘सध्याच्या महामारीने उद्‍भवलेल्या परिस्थितीमुळे आम्हाला स्पर्धा काही महिन्यांसाठी पुढे ढकलाव्या लागल्या आहेत आणि त्यामुळे यावर्षी प्रशिक्षण हेच आमचे मुख्य उद्दिष्ट्य आहे. गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने आम्ही नुकतेच पणजीफोंडानावेली येथे नियमित प्रशिक्षण शिबिरे सुरू केली आहेत आणि अन्य केंद्रावरही सुरू करणार आहोत.’’ तनिशा क्रास्टोअनुरा प्रभुदेसाईलिडिया बार्रेटोअर्जुन फळारी यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील छाप पाडली आहेत्याची कामगिरी इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे हेबळे यांनी नमूद केले. ‘‘गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने आम्ही सर्वसमावेशक असा पायाभूत विकास कार्यक्रम आखला आहे आणि इतर महत्त्वाकांक्षी योजनाही विचाराधीन आहेत्यांचे सादरीकरण आमसभेत होईल,’’ असे हेबळे यांनी स्पष्ट केले.

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या