BPS All Goa State Ranking Tennis Tournament : विजेतेपदासाठी दर्शसमोर व्हिवानचे आव्हान

मुलींत तिथी भूमकर व विधी नाईक यांच्यात अंतिम लढत
Darsh Pai And Vivan Aggarwal
Darsh Pai And Vivan AggarwalDainik Gomantak

बीपीएस अखिल गोवा राज्य मानांकन टेनिस स्पर्धेत मुलांच्या 14 वर्षांखालील एकेरीत विजेतेपदासाठी दर्श पै याच्यासमोर व्हिवान अगरवाल याचे आव्हान असेल. मुलींत तिथी भूमकर व विधी नाईक यांच्यात अंतिम लढत होईल.

स्पर्धा मडगाव येथील बीपीएस क्लब टेनिस कोर्टवर सुरू आहे. मागील एप्रिल महिन्यात पणजी जिमखाना खुल्या टेनिस स्पर्धेतही दर्श व व्हिवान आणि तिथी व विधी यांच्यात अंतिम लढत झाली होती. तेव्हा दर्श व तिथी यांनी विजेतेपदाचा किताब पटकावला होता.

Darsh Pai And Vivan Aggarwal
Microsoft Translator : अभिमानास्पद! आता मायक्रोसॉफ्टही ट्रान्सलेटरमध्ये करणार कोकणीचा समावेश

दर्श याने उपांत्य लढतीत एकही गेम गमावला नाही. त्याने एथन अताईद याला ४-०, ४-० असे हरविले. मात्र व्हिवान याला प्रखर झुंज द्यावी लागली.

शाश्वत मथियान याच्याविरुद्ध त्याने ४-१, १-४, १०-६ असा निसटता विजय प्राप्त केला. मुलींच्या १४ वर्षांखालील एकेरीत तिथी भूमकर व गार्गी ओक यांच्यातील उपांत्य लढतही रंगली. तिथीने तीन सेटमध्ये ४-१, ३-४, १०-७ असा विजय मिळविला. दुसऱ्या उपांत्य लढतीत विधी नाईकने त्विषा सरदेसाई हिला ४-३, ४-० असे पराजित केले.

इतर निकाल : पुरुष एकेरी उपांत्यपूर्व फेरी: राजाराम कुंडईकर वि. वि. राजेश बुंदेला, संतोष गोरावर वि. वि. अमन बुंदेला, अवधूत पालेकर वि. वि. अखिल शिरवईकर, पंकज नाईक वि. वि. अर्णम घोष.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com