VVS लक्ष्मण होणार आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक

या महिन्यात होणाऱ्या आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळू शकतात.
VVS लक्ष्मण होणार आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक
VVS LaxmanDainik Gomantak

या महिन्यात होणाऱ्या आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळू शकतात. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांची आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय एनसीएचे प्रशिक्षक सितांशु कोटक, साईराज बहुतुले आणि मुनीष बाली यांनाही टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये स्थान मिळणार आहे. (VVS Laxman)

समोर आलेल्या माहितीनुसार, बहुतुले गोलंदाज प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत, तर कोटक यांना फलंदाजी विभागाचे प्रशिक्षक करण्यात येणार आहे. याशिवाय बाली यांच्याकडे क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची जबाबदारी असेल. बाहुले अंडर-19 संघाच्या कोचिंग स्टाफचा एक भाग आहे, तर कोटक भारत A च्या कोचिंग स्टाफचा भाग आहे.

VVS Laxman
ICC ODI Rankings मध्ये पाकिस्तानचे बल्ले-बल्ले, टीम इंडियाचा क्लीन स्वीप

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कोचिंग स्टाफचे इतर सदस्य आयर्लंड दौऱ्यात इंग्लंडमध्ये असतील. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "राहुल द्रविड आणि उर्वरित कोचिंग स्टाफ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेच्या मध्यावर इंग्लंडला रवाना होतील. बाली, कोटक आणि बहुतुले यांना आधीच टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये सामील करण्यात आले आहे. हे तिघेही शेवटच्या दोन टी-20 सामन्यांमध्ये टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफची काळजी घेतील.

इंग्लंडविरुद्धचा महत्त्वाचा कसोटी सामना

पुढील महिन्यात टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळायचा आहे. गेल्या वर्षी झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना रद्द करण्यात आला होता. त्या सामन्याचे आयोजन पुढील महिन्यात होत आहे. सध्या टीम इंडिया कसोटी मालिकेत 2-1 ने पुढे आहे. या महिन्याच्या अखेरीस टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर सराव सामनाही खेळणार आहे.

VVS Laxman
बाबर आझमने उघड केले पाकिस्तानी संघाच्या यशाचे रहस्य, सांगितली पुढची योजना

या महिन्याच्या अखेरीस टीम इंडियाला आयर्लंडविरुद्ध दोन टी-20 सामने खेळायचे आहेत. आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची अद्याप निवड झालेली नाही. येत्या काही दिवसांत आयर्लंड दौऱ्यासाठीही टीम इंडियाची निवड होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com