IPL 2021: ''जॉनी बेअयस्टो शौचालयात होता का''?

दैनिक गोमंतक
सोमवार, 26 एप्रिल 2021

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2021)) पहिल्या सुपर ओव्हर सामन्यात दिल्लीच्या कॅपिटलने (DC) सनरायझर्स हैदराबादवर सलग तिसरा विजय नोंदविला. हैदराबादला (SRH) सुपर ओव्हरमध्ये केवळ 7 धावा करता आल्या.

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2021)) पहिल्या सुपर ओव्हर सामन्यात दिल्लीच्या कॅपिटलने (DC) सनरायझर्स हैदराबादवर सलग तिसरा विजय नोंदविला. हैदराबादला (SRH) सुपर ओव्हरमध्ये केवळ 7 धावा करता आल्या. सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करायला डेव्हिड वॉर्नर(David Warner) आणि केन विल्यमसन आले होते. या निर्णयामुळे माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) चिडला. इन-फॉर्म जॉनी बेअरस्टो का खेळायला आला  नाही, असा प्रश्न सेहवागने उपस्थित केला आहे. सोशिअल मीडियावरती सेहवागने हे ट्विट व्हायरल होत आहे.("Was Johnny Baisto in the toilet?") 

IPL 2021: युनिव्हर्स बॉसला लागले बॉलिवूडचे वेड; पहा Video

वीरेंद्र सेहवागने ट्विट केले की, 'जॉनी बेअरस्टो शौचालयात होता? सुपर ओव्हरमध्ये (Supar Over) हैदराबादकडून त्याला प्रथम पसंती का दिली नाही. हे मला समजत नाही. त्याने 18 चेंडूत 38 धावा केल्या होत्या. तो सर्वात चांगला हिटर होता. हैदराबादने चांगली लढाई केली, परंतु केवळ विचित्र निर्णयांसाठी स्वतःलाच दोषी ठरवले. दिल्ली कॅपिटलने  नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर  सलामीवीर पृथ्वी शॉ (39 चेंडूत, सात चौकार, एक षटकार), कर्णधार रिषभ पंतच्या 37 धावा आणि स्टीव्ह स्मिथच्या नाबाद  34 धावा आणि सलामीवीर शिखर धवनच्या 28 धावांच्या बळावर चार विकेटच्या मोबदल्यात 159 धाव केल्या.  

या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने सनरायझर्स हैदराबादच्या एका बाजूने किल्ला लढावला. त्याने 51 चेंडूत ६६ धावा केल्या यात त्याने 8 चौकार लगावले. एसआरएचच्या संघाने 20 षटकात सात विकेट्स गमावून 159 धावा बनवल्या. धावांची बरोबरी झाल्यामुळे सुपर ओव्हर खेळवली गेली. जगदीश सूचितच्या तडाखेबाज खेळीमुळे हैद्राबादचा संघ जिंकण्याच्या जवळ जाऊन पोहोचला. सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कडून अक्सर पटेलने गोलंदाजी केली तर हैद्राबाद कडून राशिद खानने गोलंदाजी केली.  

संबंधित बातम्या