गोव्याचा वसंत अरेना फिडे मास्टर

किशोर पेटकर
रविवार, 19 जुलै 2020

बुद्धिबळ खेळाडूव्यतिरिक्त वसंत खेळाच्या प्रशासकीय पातळीवरही सक्रिय आहे. तो पेडणे तालुका बुद्धिबळ संघटनेचा अध्यक्ष, तर गोवा बुद्धिबळ संघटनेचा उपाध्यक्ष आहे.

पणजी,

गोव्याचा माजी राज्यस्तरीय विजेता बुद्धिबळपटू वसंत नाईक याला ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेतील शानदार कामगिरीची बक्षिसी मिळाली आहे. जागतिक बुद्धिबळ महासंघाने (फिडे) त्याला अरेना फिडे मास्टर किताब बहाल केला आहे. 

कोरोना विषाणू महामारी लॉकडाऊन कालावधीत झालेल्या विविध ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत वसंत याने चमकदार खेळ करत अरेना फिडे मास्टर किताबासाठी पात्रता मिळविली. 

फिडेच्या मानांकनात वसंतचे स्टँडर्ड प्रकारात १६४७ गुण, रॅपिड प्रकारात १४७९ गुण, तर ब्लिट्झ प्रकारात १६४० गुण आहेत. बुद्धिबळ खेळाडूव्यतिरिक्त वसंत खेळाच्या प्रशासकीय पातळीवरही सक्रिय आहे. तो पेडणे तालुका बुद्धिबळ संघटनेचा अध्यक्ष, तर गोवा बुद्धिबळ संघटनेचा उपाध्यक्ष आहे.

संपादन तेजश्री कुंभार 

संबंधित बातम्या